शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
तेलंगणा सरकारने अदानी समूहाची १०० कोटींची देणगी नाकारली, कारण...
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
4
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
5
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
6
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
7
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
8
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
9
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
10
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
11
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
12
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
13
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
14
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
15
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
16
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
17
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
18
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
19
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
20
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."

सर्पमित्र घेतायत विषाची परीक्षा !

By admin | Published: September 01, 2014 9:20 PM

जीवघेणा दंश : माहिती असूनही अनावधानाने जावे लागते मृत्यूच्या जबड्यात

कऱ्हाड : विषाची परीक्षा घ्यायची नसते, असं म्हणतात; पण अनेक सर्पमित्र दररोज विषारी जीव हाताळतात, त्याचे दंश पचवतात. अनावधानाने झालेल्या बहुतांश सर्प दंशांवर प्राथमिक उपचाराची मात्रा लागू पडते. मात्र, एखादा दंश अगदीच जीवघेणा ठरतो. सापाचं विष शरीरभर भिनत आणि तो दंश सर्पमित्राला मृत्युशी झुंजवतो. मलकापुरात राहणारा संजय देसाई हा सर्पमित्र युवक गत दोन दिवसांपासून रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार घेतोय. साप पकडताना झालेला दंश त्याच्या जीवावर बेतलाय; पण या परिस्थितीत फक्त कुटुंबीय आणि मित्र त्याच्या सोबतीला आहेत. एरव्ही साप आढळलाय, या एका कॉलवर शहरासह तालुक्यात स्वखर्चाने कुठेही जाणारा संजय आज एकटाच मृत्यूचा सामना करतोय. रविवारी मध्यरात्री दंश झाल्यानंतर त्याला एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दहा-बारा तासांच्या उपचारानंतर संबंधित रुग्णालयाने संजयच्या उपचाराचा खर्च तब्बल ५४ हजार झाला असल्याचे सांगितले. त्यावेळी मित्रांनी हजार-पाचशेची जमवाजमव करून संबंधित रुग्णालयाचा खर्च भागविला. तसेच बेशुद्धावस्थेत असलेल्या संजयला पुढील उपचारासाठी कृष्णा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात हलवले. अजूनही संजयला शुद्ध आलेला नाही. कऱ्हाड शहरासह तालुक्यात शेकडो सर्पमित्र कार्यरत आहेत. ज्यावेळी एखाद्या ठिकाणी साप आढळतो, त्यावेळी फोनाफोनी होते. सर्पमित्राला बोलवले जाते. त्यानंतर सर्पमित्र स्वत:चा जीव धोक्यात घालून साप पकडतात. सर्वसामान्यांसाठी हे नाट्य इथेच संपते; पण सर्पमित्रांना फक्त साप पकडून चालत नाही, तर त्याला इजा न होता बंदिस्त करावे लागते. एखाद्या काचेच्या बाटलीत किंवा प्लास्टिक पिशवीमध्ये साप ठेवून एकट्यानेच त्याला सुरक्षित ठिकाणी न्यावे लागते. हे काम जोखमीचे असते. मात्र, नागरिकांना सर्पदंशापासून आणि सर्पांना जीव गमावण्यापासून वाचविण्यासाठी सर्पमित्र ही जोखीम पत्करतात. साप पकडण्यासाठी सर्पांविषयीची संपूर्ण माहिती असणे आवश्यक असते. सर्पांच्या जाती, विषारी-बिनविषारी सर्प, त्याला पकडण्याची पद्धत आदी माहिती अवगत असणे गरजेचे असते. बहुतांश सर्पमित्रांचा यामध्ये हातखंडा आहे. मात्र, कधी-कधी अनावधानाने झालेला दंश त्यांना मृत्यूच्या दाढेत पोहोचवतो. संजय देसाई या सर्पमित्राबाबतही नेमकं हेच घडलंय. आजपर्यंत त्याला अनेक सर्पांचा दंश झालाय. मात्र, प्राथमिक उपचार अथवा रुग्णालयात एखादा दिवस अ‍ॅडमिट राहण्याव्यतिरिक्त इतर कुठलाही बाका प्रसंग त्याच्यावर बेतलेला नव्हता. मात्र, आज तो मृत्यूचा सामना करतोय. (प्रतिनिधी)सर्पमित्रांचा जनजागृती कार्यक्रमकऱ्हाडमध्ये कार्यरत असणारा सर्पमित्रांचा ग्रुप साप पकडण्याबरोबरच सर्पांविषयीचे जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करतो़ त्या कार्यक्रमांमध्ये सर्पांच्या जाती, विषारी-बिनविषारी सर्प ओळखण्याची पद्धत, सर्पांचा आहार, शरीराची ठेवण आदींविषयी माहिती दिली जाते़ तसेच लोकांच्या मनातील भीती घालविण्यासाठी सापही त्यांच्या हातामध्ये दिले जातात़ डॉक्टरही घेतात सर्पमित्रांचा सल्लातसेच रूग्णालयामध्ये स्नेक बाईटचा एखादा रूग्ण आल्यास डॉक्टर या ग्रुपमधील सदस्यांना फोन करून त्याठिकाणी बोलावून घेतात़ संबंधित रुग्णाला कोणत्या सर्पाने दंश केला असावा, याबाबत डॉक्टर त्यांच्याकडून सल्ला घेतात़ ग्रुपच्या सदस्याने सर्पाच्या जातीविषयी माहिती दिल्यानंतर डॉक्टरांकडून पुढील उपचार सुरू केला जातो़ का होतो सर्पदंश ?सापाचे १५ ते २० मि़ ग्रॅ़ विषही माणसासाठी प्राणघातक ठरू शकते़ मण्यार जातीच्या सर्पाचा दंश झाल्यानंतर त्वरित उपचार न झाल्यास दोन तासांत रूग्ण दगावू शकतो़ साप विनाकारण कधीही दंश करीत नाही़ त्याला डिवचले, मारण्याचा प्रयत्न केला किंवा साप कोंडीत सापडला, तरच तो दंश करतो़विषारी सापांची दंशावेळी विष सोडण्याची क्षमता कमी जास्त असली तरी साधारणपणे एका दंशावेळी साप १५० मि़ ग्रॅ़ विष सोडतो़ बिनविषारी सर्पाचा दंश झाला तरी कालांतराने जखम बळावण्याची व धनुर्वातासारख्या आजराची लागण होण्याची शक्यता असते़ त्यामुळे जखमेवर उपचार करणे गरजेचे असते़