मसूर : प्रजापिता ब्रम्हकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या वतीने अखील भारतीय किसान सशक्तीकरण अभियानाचा समारोप मसूर मध्ये झाला. अध्यक्षस्थानी पुणे मिरा सोसायटीच्या वरिष्ठ राजयोग शिक्षिका उषा बहेणजी होत्या. या माध्यमातून मसूरमध्ये अध्यात्म आणि सेंद्रिय शेतीची सांगड घालण्यात आली.याप्रसंगी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मानसिंंगराव जगदाळे, काँगे्रसचे जिल्हासरचिटणीस नंदकुमार जगदाळे, तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय खरात, सैदापूरचे कृषी मंडलाधिकारी श्रीनिवास खबाले, विष्णूभाईजी, श्रीकांत जिरंगे, सह्याद्रीचे संचालक संजय जगदाळे, ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष दिलीप पाटील, उदयोजक दिलीपराज लंगडे उपस्थित होते.मानसिंगराव जगदाळे यांनी मसूरच्या ब्रम्हकुमारी केंद्राचे सामाजिक , शेतीविषयक उपक्रम मोलाचे असल्याचे सांगून शेतकऱ्यांनी नवनवीन तंत्रज्ञान अबलंबून शाश्वत शेती करण्याची गरज आहे,’ असे सांगितले.नंदकुमार जगदाळे म्हणाले ‘निसर्गाच्या चक्रात अडकल्याने शेतकऱ्यांमध्ये नैराश्य पसरले आहे. रासायनिक शेतीने जमिनीचा ऱ्हास होत चालला आहे. जमीन नापीक बनत आहे. प्रायोगिक शेतीतून सशक्त सकस अन्न तयार होऊन भावी पिढीही निरोगी निकोप बनेल. अशा या प्रायोगिक शेती बिजाचा वटवृक्ष व्हावा.’ मनीषा बहेनजी म्हणाल्या, ‘गेल्या पंधरा दिवसांत ८० गावांत हे अभियान पोहोचविण्यात यश आले. शेती व शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शन करण्यात आले. अध्यात्मिक ज्ञानाबरोबरच व्यसनमुक्ती कार्यक्रम, शेती विषयक जागृती, सेंद्रिय व प्रायोगिक शेतीचा प्रसार व प्रचार करण्यात आला आहे.’ विष्णूभाई म्हणाले, ‘रासायनिक विषारी औषधांमुळे जमीन नापीक होते. दूषित अन्न व पाणी यांचा प्रादुर्भाव वाढतो. त्याचा परिणाम आयुमर्यादेवर होत आहे. त्यासाठी सेंद्रिय शेतीचा अवलंब करा. शेती नापीक होण्यापासून वाचवा त्यासाठी या जनजागृतीच्या कार्यक्रमाचा लाभ घेत योगाचा आधार घेऊन कमी खर्चात जास्त उत्पादन पिकवा.’ कृषी अधिकारी दत्तात्रय खरात यांनी कृषीप्रधान देशात शेतीकडेच दुर्लक्ष होत असून, त्यांच्यात जागृती होण्याची नितांत गरज असल्याचे सांगून म्हणाले, ‘कृषी विभाग व विश्वाविद्यालयाच्या समन्वयातून केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना शेतकऱ्यांमार्फत पोहोचवून शेतकरी स्वंयपूर्ण बनण्यासाठी कृषीविभाग सर्वोतोपरी सहकार्य करेल.’डॉ. वैशालीदेवी यांनी ब्रम्हकुमारी विद्यालयाच्या कार्याचा परीचय करून दिला.मसूर केंद्राच्या संचालिका शैलजा बहेनजी यांनी स्वागत केले. सुलभाबहेनजी यांनी सूत्रसंचालन केले. कऱ्हाड सेवा केंद्राच्या संचालिका उषा बहेनजी यांनी आभार मानले.कार्यक्रमास शैलजा दिदी, बजरंग भाई, मुक्ता बहेणजी, योगिनी बहेणजी, शिवाणी बहेणजी, कांचन बहेणजी, शकुंतला बहेणजी, संतोषभाई , अभिजितभाई, विलासभाई, सचिनभाई,यांच्यासह जिल्ह्यातील केंद्र संचालिका, बहेण , भार्इंजी उपस्थित होते. (वार्ताहर)
अध्यात्म आणि सेंद्रिय शेतीची सांगड!
By admin | Published: December 14, 2015 8:35 PM