कऱ्हाड : ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी तथा ‘लोकमत’चे संस्थापक, संपादक जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. कऱ्हाडात शुक्रवारी ठिकठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रक्तदानाच्या माध्यमातून अनेकांनी सामाजिक बांधिलकी जपली.
‘लोकमत’च्या वतीने ‘रक्ताचं नातं’ ही भव्य रक्तदान मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेद्वारे रक्ताची गरज भागविण्याचे कार्य ‘लोकमत’द्वारे केले जाणार आहे. शुक्रवारी कऱ्हाडात या मोहिमेअंतर्गत तीन ठिकाणी शिबिर घेण्यात आले. वारुंजी येथे पहिले शिबिर घेण्यात आले. शिबिराचे उद्घाटन राहुल पवार, ग्रामपंचायत सदस्य महेश पाटील, आयेशा बागवान, अरबाज बागवान, मंगलमूर्ती विश्वस्त सेवा ट्रस्टचे अतुल शिंदे आणि अशोक शिंदे या वेळी उपस्थित होते. या वेळी रुपाली उबाटे (ओ पॉझिटिव्ह), श्रेयस पाटील (ओ पॉझिटिव्ह), सुनील देशमुख (बी पॉझिटिव्ह), विशाल पवार (ओ पॉझिटिव्ह), सागर पाटणे (ए पॉझिटिव्ह), गणेश चव्हाण (ए पॉझिटिव्ह), देवेंद्र चिकुर्डेकर (ए पॉझिटिव्ह), अरबाज बागवान (एबी पॉझिटिव्ह), अजिंक्य चव्हाण (बी पॉझिटिव्ह), मंगेश यादव (ए पॉझिटिव्ह), आयेशा बागवान (ए पॉझिटिव्ह) यांनी रक्तदान केले. महालक्ष्मी ब्लड बँकेने या शिबिराला सहकार्य केले.
दुपारच्या सत्रात लायन्स क्लबच्या वतीने यशवंत ब्लड बँकेत शिबिर घेण्यात आले. त्याचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने झाले. या वेळी लायन्स क्लबचे पदाधिकारी महेश खुस्पे, मंजिरी खुस्पे, मिलिंद भंडारे, राजेश शहा, प्रवीण भोसले, जयंत पालकर, खंडू इंगळे, सुहास पाटील, राजेश शहा, सतीश मोरे, अरुणभाई देसाई, यशवंत ब्लड बँकेचे प्रमुख डॉ. संदीप यादव हे उपस्थित होते.
यावेळी सिद्धार्थ शिंदे (ए पाॅझिटिव्ह), सुहास पाटील (ओ पाॅझिटिव्ह), मिलिंद भंडारे (ओ पाॅझिटिव्ह), दिग्विजय पाटील (ओ पाॅझिटिव्ह), प्रवीण भोसले (ए पाॅझिटिव्ह), निखिल कुलकर्णी (ए पाॅझिटिव्ह) आदींनी रक्तदान केले.
फोटो
वारुंजी ता. कऱ्हाड येथे रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी मान्यवर उपस्थित होते.
कऱ्हाड येथे रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी लायन्स क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते.