कोरोना लसीकरणासाठी नगरपालिकेने चांगलीच कंबर कसली आहे. शहरातील ४५ वर्षांवरील नागरिकांना लस देण्याकरिता काले प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येथील भारती विद्यापीठ, विधि महाविद्यालयात व गणेश कॉलनीमधील वुमन्स फॅसिलिटी सेंटर अशी पहिली दोन लसीकरण केंद्रे सुरू केली. लसीकरणासाठी केंद्रामध्ये अविरतपणे कार्य करणाऱ्या पालिकेचे अधिकारी, आशा सेविका, कर्मचारी आणि डॉक्टर, आरोग्य सेवक आणि आरोग्य सेविकांनी शहरातील नागरिकांचे प्रबोधन करत प्रोत्साहन दिले. दोन ठिकाणी सुरू केलेल्या कोविड-१९ लसीकरण केंद्रांत शासनाच्या नियमांचे पालन करून नागरिकांना लसीकरण सुरू आहे.
मलकापुरात कोरोना लसीकरणास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, दहा दिवसांत २ हजारपेक्षा अधिक नागरिकांना लसीकरण केले आहे. अजूनही ४५ वयोगटापेक्षा जास्त असलेल्या व लस न घेतलेल्या नागरिकांनी नोंद करून लस घेण्याचे आवाहन मुख्याधिकारी राहुल मर्ढेकर, नगराध्यक्षा निलम येडगे, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका व मलकापूर पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
चौकट
लसीकरण केंद्र व नोंदणी ठिकाण
भारती विद्यापीठ, छत्रपती शिवाजीराजे चौक, मलकापूर
वुमन्स फॅसिलिटी सेंटर, गणेश कॉलनी उद्यान, आगाशिवनगर