रामापूर : ‘लोकमत’चे संस्थापक संपादक दिवगंत जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त बाळासाहेब देसाई काॅलेज, पाटण येथे काॅलेजचे एनसीसी, एनएसएस, आधार सामाजिक संस्था, पाटण रोटरी क्लब पाटण यांच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले. यामध्ये ४१ जणांनी रक्तदान केले.
पाटणच्या बाळासाहेब देसाई काॅलेजमध्ये ‘लोकमत’तर्फे आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन ‘लोकमत’चे संस्थापक संपादक दिवंगत जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेचे पूजन करुन करण्यात आले. या वेळी कोयना शिक्षण संस्थेचे सदस्य संजीव चव्हाण, प्राचार्य डाॅ. एस. डी. पवार, नगराध्यक्ष अजय कवडे, उपनगराध्यक्ष विजय टोळे, पाटण रोटरी क्लबचे अध्यक्ष, सतीश रणदिवे, डाॅ. वीणा नांगरे, डाॅ. विद्या पाटील, प्रदीप साळवेकर, एनसीसी, एनएसएसचे विद्यार्थी यांची प्रमुख उपस्थिती होती.
कोराना महामारीत रक्ताची टंचाई सर्वत्र भासत आहे. अशा परिस्थतीत बांधिलकीतून या शिबिराचे आयोेेेेजन केले आहे. पाटण येथील गजानन सेवा बाल गणेश मंडळाच्या सदस्य आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्रित येऊन रक्तदान केले. त्यांना प्राचार्य यांचे प्रमाणपत्र देण्यात आले. एनएसएसचे कार्यक्रम अधिकारी प्रा. जी. एस. पटेटबहादूर यांनी प्रास्तविक केेले. एनसीसीप्रमुख प्रा. एस. पी. पाटील यांनी आभार मानले.
यामध्ये गटनिहाय रक्तदाते असे : ओ पॉझिटिव्ह : राजेद्र कुंभार, पूनम खैरमेाडे, नीलेश साळुंखे, शुभम आरेकर, शिवाजी सुतार, संजय साबळे, सचिन देसाई, प्रवीण पडवळ, नितीन कुंभार, आशिष पाटणकर, ओंकार मोहिते, शंकर मोळावडे, साहिल यादव.
ए पॉझिटिव्ह : ओेंकार कोळी, अनिल पाटील, उत्तम घाडगे, सौरभ नेवरेकर, किसन देवकर, रविकांत पवार, स्वप्नील कुंभार, ज्ञानेश्वर तवटे, अनिल मोहिते, ओंकार मोहिते, श्रीगणेश गायकवाड, रोेहन भाकरे, सुहास कांबळे, नितीन जाधव.
बी पॉझिटिव्ह : विजय मोहिते, योगिता डोंगरे, जगदीश शेंडे, तस्लीम मुल्ला, संकेत कुंभार, रोहित कुंभार, विकास कुंभार, प्रतीक शिर्के, प्रवीण जाधव, प्रकाश शिर्के, विजय यादव, समीर चव्हाण, दादासाहेब कुंभार, राजेंद्र कुंभार.
फोटो ०९पाटण-ब्लड डोनेशन
पाटण येथे ‘लोकमतर्फे शुक्रवारी आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन ‘लोकमत’चे संस्थापक संपादक दिवंगत जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमापूजनाने झाले. या वेळी कोयना शिक्षण संस्थेचे सदस्य संजीव चव्हाण, प्राचार्य डाॅ. एस. डी. पवार, नगराध्यक्ष अजय कवडे, उपनगराध्यक्ष विजय टोळे, सतीश रणदिवे, डाॅ. वीणा नांगरे, डाॅ. विद्या पाटील, प्रदीप साळवेकर उपस्थित होते.