कऱ्हाड : विजय दिवस समारोहाच्या पार्श्वभूमीवर समिती आणि पालिकेच्यावतीने रविवारी सकाळी प्लास्टिकमुक्त कऱ्हाड दौड काढण्यात आली. त्यामध्ये समिती, पालिकेचे तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी, सदस्य, शहर व परिसरातील शाळांतील शेकडो विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला.कऱ्हाड येथील दत्त चौकातून प्लास्टिकमुक्त दौडला आमदार आनंदराव पाटील यांनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर प्रारंभ झाला. यावेळी शिक्षण मंडळ कऱ्हाडचे अध्यक्ष बाळासाहेब कुलकर्णी, निवृत्त कर्नल संभाजीराव पाटील, मुख्याधिकारी यशवंत डांगे, धनलक्ष्मी संस्थेचे दिलीप चव्हाण, सलीम मुजावर, संध्या पाटील, पौर्णिमा जाधव, आरोग्य सभापती गजेंद्र कांबळे, लोकशाही आघाडीचे नगरसेवक सौरभ पाटील, ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर, विद्या पावसकर, स्मिता हुलवान, अॅड. संभाजीराव मोहिते, प्लास्टिकमुक्त कऱ्हाड दौड समिती प्रमुख ए. आर. पवार, अॅॅड. परवेज सुतार, प्रा. जालिंदर काशीद, रत्नाकर शानभाग, प्रा. महालिंग मुंढेकर, चंद्र्रकांत जाधव, विलासराव जाधव यांच्यासह रोटरी, लायन्स क्लबचे पदाधिकारी, खेळाडू व मान्यवरांच्या हस्ते प्रारंभ झाला.दत्त चौक, चावडी चौक, कन्याशाळा, उपजिल्हा रुग्णालय, विजय दिवस चौकमार्गे छत्रपती शिवाजी स्टेडियम यामार्गे रविवारी सकाळी प्लास्टिकमुक्त कऱ्हाड दौड काढण्यात आली. यामध्ये लाहोटी कन्या प्रशाला, टिळक हायस्कूल, यशवंत हायस्कूल, यशवंत हायस्कूल या तीन शाळांमधील विद्यार्थी, शिक्षक सहभागी झाले होते. दौडीतील विद्यार्थी, शिक्षक व मान्यवरांना छत्रपती शिवाजी स्टेडियम परिसरात प्लास्टिकमुक्त कऱ्हाडची शपथ देण्यात आली. यानंतर दौडीची सांगता झाली.प्लास्टिक हटाव; बिमारी बचाओरॅलीमध्ये सहभागी विद्यार्थी, स्वच्छतादूत, कर्मचाऱ्यांच्यावतीने प्लास्टिकमुक्तीच्या प्लास्टिक हटाव, बिमारी बचाओ आदींसह विविध प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या. घोषणा, फलकांद्वारे नागरिकांमध्ये यावेळी विद्यार्थी, पालिकेच्यावतीने प्लास्टिक पिशव्या न वापरण्याबाबत जनजागृती करण्यात आली.
प्लास्टिकमुक्त कऱ्हाड दौडला उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 11:56 AM
विजय दिवस समारोहाच्या पार्श्वभूमीवर समिती आणि पालिकेच्यावतीने रविवारी सकाळी प्लास्टिकमुक्त कऱ्हाड दौड काढण्यात आली. त्यामध्ये समिती, पालिकेचे तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी, सदस्य, शहर व परिसरातील शाळांतील शेकडो विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला.
ठळक मुद्देप्लास्टिकमुक्त कऱ्हाड दौडला उत्स्फूर्त प्रतिसादविजय दिवस समारोह : विविध शाळा, संस्थांची उपस्थिती