शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ही काय भानगड! मतदान अन् EVM ची मते कुठे जुळली नाही?; ९५ मतदारसंघात मतांमध्ये तफावत
2
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
3
४ जणांचा मृत्यू , २० हून अधिक पोलीस जखमी… संभलमध्ये बाहेरच्या लोकांना प्रवेश नाही; काय आहे प्रकरण?
4
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
5
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
6
RIL share price: रिलायन्स इंडस्ट्रीजवर ब्रोकरेज बुलिश, रिस्क रिवॉर्ड अनुकूल; दिला खरेदीचा सल्ला
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अनेक नेत्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात; कुणी कमावलं तर कुणी काय गमावलं? जाणून घ्या
8
मासेमारी करणाऱ्या बोटीत सापडले पाच टन ड्रग्ज, तटरक्षक दलाची सर्वात मोठी कारवाई
9
स्टेजवर जाऊन बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला केलं प्रपोज! दिलजीत दोसांझच्या पुणे कॉन्सर्टमधील व्हिडीओ व्हायरल
10
अहिल्यानगरमध्ये भाजपच्या दोघांना, राष्ट्रवादीच्या एकाला मिळू शकते संधी; मंत्रिपदाचे सात दावेदार!
11
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
12
रश्मिका, तू कोणाशी लग्न करणार? 'श्रीवल्ली'ने दिलेलं उत्तर ऐकून एकच हशा पिकला
13
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
14
महायुतीला १३८ जागांवर ५० टक्क्यांहून अधिक मतं, १६ ठिकाणी लाखांचं मताधिक्य, अवाक् करणारी आकडेवारी
15
Adani Group shares: अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: कोणत्या पक्षाचे किती विद्यमान आमदार पराभूत?; ६ आमदाराचे डिपॉझिटही जप्त
17
"विचारधारा वगैरे आता विसरायला हवं"; धक्कादायक निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान
18
"देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना भेटून...", निवडणुकीनंतर अनुपम खेर यांची खास पोस्ट
19
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
20
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी

‘श्रीरामवरदायिनी’ची वाट झालीय बिकट!

By admin | Published: February 25, 2015 9:24 PM

महाबळेश्वर : शिवकालीन बाजारपेठही दुर्लक्षाच्या फेऱ्यात

महाबळेश्वर : महाबळेश्वरासून वीस किलोमीटर अंतरावर प्रतापगड पायथ्याशी असलेल्या पार गावातील श्री रामवरदायिनी या ऐतिहासिक स्थळाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाल्याने शिवकालीन बाजारपेठकडे जाणारी ही वाट बिकट झाली आहे.सलग आठ ते दहा वर्षे या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. या रस्त्यामध्ये मोठ-मोठे खड्डे पडलेले आहेत. हा रस्ता पहिला जिल्हा परिषदेमध्ये होत. परंतु आता हा रस्ता सार्वजनिक बांधकाम या खात्याकडे देण्यात आला आहे. त्यामुळे मुंगीच्या गतीने या रस्त्याचे काम चालू आहे. शिवकालीन रामवरदायिनी मंदिराकडे पर्यटक व स्थानिक तसेच पंचक्रोशीमधील अनेक नागरिक या स्थळास भेट देत असतात. अनेक वर्षांपासून रस्त्याची दुरवस्था झाल्याने अपघाताला निमंत्रण देत आहे. त्यामुळे नागरिकांत प्रचंड नाराजी आहे. पर्यटक प्रतापगडास भेट देत असताना पार या शिवकालीन ऐतिहासिक स्थळालादेखील भेट देतात.वाडा कुंभरोशीपासून पार या गावचे प्रवेशद्वार आकर्षित बनविण्यात आला आहे. शिवकाळामध्ये पार या गावाला मोठी बाजारपेठ मानले जात होते. याच गावात श्रीरामवरदायिनीचे ऐतिहासिक मंदिराच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातून भाविक येत असतात. प्रवेशद्वारच फक्त सुंदर दिसत असून,रस्त्याची मात्र पूर्णत: वाट लागली आहे. हे लक्षात यायला फारसा वेळ लागत नसल्याने पर्यटक तसेच स्थानिक नागरिकही हैराण झाले आहेत. या रस्त्याचे स्थानिक व पर्यटकही दुचाकीवरून प्रवास करतात. त्यांना अपघाताची भीती देखील वाटत आहे. प्रतापगडावर दर्शनासाठी येणाऱ्या पर्यटक रामवरदायिनी देवीचे दर्शन घ्यायला जायचे आहे. असे स्थानिक वाहनधारकांना सांगतात. मात्र, रस्ता खराब असल्याने तिकडे जाण्याचे टाळले जाते. (प्रतिनिधी)