सातारा : नाशिक येथे सुरू असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यास जगभरातून साधूसंत येत आहेत. नाशिकच्या मदतीसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा विभागातून दोन टप्प्यांमध्ये १७५ गाड्या जाणार आहेत. देवदर्शनाला सातारी एसटी गेल्या असल्याने येथील लेकरांच्या शिक्षणाचा मात्र खोळंबा व्हायला लागला आहे. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांनी विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनास हेच कारणीभूत ठरत असल्याचे समोर येत आहे.कुंभमेळ्यासाठी एसटीने नियोजन केले आहे. यामध्ये २९ आॅगस्ट रोजी पहिला टप्पा सुरू होत आहे. यासाठी २७ रोजी ७५ गाड्या नाशिक विभागाला देण्यात आल्या आहेत. या गाड्यांबरोबर चालक व वाहकही पाठविण्यात येणार असून, आठ चालक जादा देण्यात आले आहे. यासाठी सातारा, कऱ्हाड येथून प्रत्येक दहा, कोरेगाव, फलटण, वाई, पाटण, दहिवडी आगारांतून प्रत्येक सात तर महाबळेश्वर, मेढा, पारगाव-खंडाळा, वडूज आगारांतून प्रत्येक पाच गाड्या दिल्या आहेत.दुसरा टप्प्यासाठी ११ सप्टेंबरला सातारा विभागातून शंभर गाड्या सोडण्यात येणार आहेत. या गाड्यांबरोबरही चालक-वाहक देण्यात येणार असून, दहा चालक जादा पुरविण्यात येणार आहेत. यामध्ये सातारा आगार १६, कऱ्हाड १३, कोरेगाव, फलटण, वाई आगारांतून प्रत्येकी १०, पाटण, दहिवडी आगारांतून प्रत्येकी ८, महाबळेश्वर येथून ५, मेढा, पारगाव-खंडाळा येथून ६ तर वडूज आगारातून ८ गाड्या देण्यात येणार आहेत. नाशिकच्या कुंभमेळ्यात वाहनांची कमतरता जाणवू नये म्हणून वेगवेगळ्या विभागातून गाड्या सोडण्याचे नियोजन राज्य पातळीवरुन ठरले असल्याने अंमलबजावणीशिवाय सातारा विभागाच्याही हातात काही उरले नाही. वरिष्ठ पातळीवरुन ठरल्याप्रमाणे जरूर गाड्या जरूर द्याव्यात, पण येथील अडचण होणार नाही, याचीही काळजी घेणे महामंडळाचेच काम आहे. (प्रतिनिधी)विद्यार्थ्यांच्या अडचणीसातारा तालुक्यातील सोनगाव, आसनगाव परिसरातील विद्यार्थ्यांनी ज्याप्रकारे गुरुवारी आंदोलन केले, त्याचप्रमाणे वाई, खटावसह अनेक भागातून विद्यार्थ्यांच्या अडचणी समोर येऊ लागल्या आहेत. दोन वर्षांपूर्वी विद्यार्थी अनेकदा आंदोलने करत होती. हे मध्यंतरी कमी झाले होते. मात्र, हे प्रमाण आठ दिवसांत वाढले आहे.
लेकरांच्या शिक्षणाचा खोळंबा करुन एसटी बसेस देवदर्शनाला!
By admin | Published: September 03, 2015 10:10 PM