शहरं
Join us  
Trending Stories
1
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
2
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
3
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
4
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
5
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
6
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
7
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
8
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
9
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
10
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
11
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
12
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
13
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
14
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
15
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
16
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
17
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
18
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
19
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम
20
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 

Satara News: आळंदी-पंढरपूर पालखी मार्गावर एसटी-कारला भीषण धडक; एक ठार, नऊ जखमी

By जगदीश कोष्टी | Published: March 25, 2023 4:35 PM

सतीश कार्वे कोळकी : आळंदी-पंढरपूर पालखी मार्गावर फलटण तालुक्यातील पिंपरदजवळ एसटी व कार यांच्यात समोरासमोर भीषण धडक झाली. या ...

सतीश कार्वेकोळकी : आळंदी-पंढरपूर पालखी मार्गावर फलटण तालुक्यातील पिंपरदजवळ एसटी व कार यांच्यात समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात एक ठार तर नऊ जण जखमी झाले. कमल भीमराव यलपले (वय ७०) असे मृत वृद्धेचे नाव आहे. जखमीत एसटीतील पाच विद्यार्थ्यांसह महिला वाहकाचा समावेश आहे. हा अपघात आज, शनिवारी सकाळच्या सुमारास झाला. तर चालक मोहन भीमराव यलपल्ले, पुतण्या सोयम यलपले, मुलगा वरद यलपले (सर्व रा. यल्लमड मंगेवाडी, ता. सांगोला) हे कारमधील जखमी झाले. तर एसटीमधील स्वाती बंडू खोमणे (१७, रा. निंबळक), दयानंद सीताराम गावडे (१९, रा. गुणवरे), श्रध्दा सूर्यकात दळवी (१७), आकांशा बापू चव्हाण (१७, दोघी रा. शेरे शिंदेवाडी), पूजा बिपिन निंबाळकर (१७, रा. निंबळक) व महिला वाहक आश्विनी जयराम गोसावी हे जखमी झाले. फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, आळंदी-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर गुणवरेहून फलटणच्या दिशेने निघालेली एसटी (एमएच १४ बीटी १२६७) आणि फलटणहून सांगोलाच्या दिशेने चाललेली कार (एमएच १२ डीवाय १५०२) यांची पिंपरद हद्दीतील बंडातात्या कराडकर यांच्या व्यसनमुक्ती केंद्राजवळ समोरासमोर धडक झाली. यात एक ठार तर नऊ जण जखमी झाले.याअपघात प्रकरणी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात मोहन भीमराव यलपले व चालक शरद वडगावे यांनी एकमेकांच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे. फलटण ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक स्वाती धोंगडे तपास करीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAccidentअपघातDeathमृत्यू