शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

Satara: जाधववाडी जवळील फरशीपुलाजवळ भगदाड, धोकादायक वाहतूक 

By दीपक शिंदे | Published: July 22, 2023 12:00 PM

पूल कोसळून अपघाताची शक्यता

सणबूर : मालदन स्टॉप ते पाचपुतेवाडी हा एक किलोमीटर अंतराचा रस्ता ढेबेवाडी विभाग व काळगाव विभागाला जोडणारा जवळचा मार्ग आहे. नेहमी वाहतूक असलेल्या या मार्गावर जाधववाडी फाट्या जवळील ओढ्यावर नवीन साकव पुलाचे बांधकाम झाले. मात्र, साकव पुलाच्या बांधकामात अजून भरावाचे काम अपूर्ण असून, पावसाळ्यापूर्वी भराव न टाकल्यामुळे  रस्ता खचून वाहतूक धोकादायक झाली आहे. ऐन पावसाळ्यात रस्ता तुटण्याचा धोका निर्माण झाला आहे.ढेबेवाडी विभाग हा अनेक खो-यांमध्ये विभागला आहे. विभागातील मध्यवर्ती बाजारपेठेचे ठिकाण म्हणून ढेबेवाडी बाजारपेठेची ओळख आहे. पोलीस ठाणे, वन विभागाचे कार्यालय, शाळा, महाविद्यालय, ग्रामीण रुग्णालय व इतर शासकीय कामकाजासाठी याठिकाणी विभागातील अनेक गावांतील ग्रामस्थांचा राबता असतो.काळगाव-धामणी-कुठरे खोऱ्यातील गावे, वाड्या येथील लोकांना बाजारपेठेत येण्यासाठी किंवा तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी पाचपुतेवाडी ते मालदन स्टॉप दरम्यान जवळच्या मार्गाचा वापर करावा लागतो. त्यामुळे या मार्गावर नेहमीच वहातूक असते. दोन वर्षा पुर्वी जुलै महिन्यातील अतिवृष्टीमुळे या एक कि.मी. मार्गावर जाधववाडी फाट्याजवळ असलेल्या फरशी पुलाला रस्त्याच्या लगत १० ते १५ फूट खोल भगदाड पडलेले होते. अवजड वाहनांमुळे संपूर्ण फरशी पूल कोसळून अपघाताची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, काही महिन्यापूर्वी या रस्त्याचे डांबरीकरण काम झाले असून या धोकादायक फरशी पुलाच्या ठिकाणी नवीन साकव पुलाचे काम मंजूर होऊन पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. मात्र, साकव पुलाचे बांधकाम झाले असून भरावाचे काम अपूर्ण असल्यामुळे येथील रस्ता खचू लागला असून अपघाताचा धोका वाढला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरroad transportरस्ते वाहतूक