शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
5
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
6
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
7
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
8
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
9
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
10
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
11
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

साताऱ्यात शहर बस सेवेसाठी कृती समितीच्या हालचाली!, गेली २० वर्षे बस सेवा बंद 

By प्रगती पाटील | Published: September 26, 2023 6:27 PM

सातारा : वाढते इंधनाचे दर, वाहनांच्या वाढत्या किमती, पार्किंगची गैरसोय, अपुरे रस्ते, वाहतुकीची कोंडी यामुळे सातारकर हैराण आहेत. या ...

सातारा : वाढते इंधनाचे दर, वाहनांच्या वाढत्या किमती, पार्किंगची गैरसोय, अपुरे रस्ते, वाहतुकीची कोंडी यामुळे सातारकर हैराण आहेत. या पार्श्वभूमीवर गेली २० वर्षे बंद असलेली शहर बस वाहतूक सेवा सुरू करावी अशी मागणी समस्त सातारकरातून जोर धरू लागली आहे. ही मागणी तडीस नेण्यासाठी साताऱ्यात कृती समितीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.सातारा शहरात यापूर्वी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची शहर बस सेवा सुरु होती.  20 वर्षांपूर्वी ही सेवा बंद झाली. मागील 20 वर्षांत सातारा शहराचा विस्तार आणि लोकसंख्याही लक्षणीयरित्या वाढली. परिसरातील उपनगरेही आता सातारा नगर पालिकेच्या हद्दीमध्ये आली आहेत. शहराची रचना डोंगर उताराची असल्याने चालत सर्वत्र येणे-जाणे शक्‍य होत नाही. दुचाकी चालवता न येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी कोणताही किफायतशीर वाहतुकीचा पर्याय उपलब्ध नाही. प्रत्येकाला माणसा गणिक दुचाकी खरेदी करणे व वापरणे परवडणारे नाही.शहरात पुण्याप्रमाणे सीएनजी रिक्षा नाहीत. शिवाय इंधनाच्या वाढत्या दरामुळे रिक्षाचालकांना मीटरवर रिक्षा चालवणे परवडत नाही. इतकी वर्षे रस्तेही ठिक नसल्याने रिक्षा दुरुस्तीवरही मोठा खर्च होत असे. खावली-रेल्वे स्टेशन ते दरे खुर्द हा पूर्व-पश्‍चिम विस्तार आणि बोगदा ते लिंबखिंड असा दक्षिण-उत्तर विस्तार पाहता जगतापवाडी-तामजाईनगरसह अनेक भागांना जोडणारी सिटी बस सेवा सुरु होणे गरजेचे आहे. सध्याचा गणेशोत्सव असेल किंवा येणारे नवरात्र असेल, सातारा शहरात गेल्या काही वर्षांत वाहतुकीची कोंडी नित्याची झाली आहे. सातारा शहराची रचना चढ-उताराची असल्याने दैनंदिन कामांसाठी हाताशी काही वाहन असणे आवश्‍यक ठरले आहे. त्यामुळे शहरात वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. त्यामुळे प्रदूषणा बरोबरच पार्किंगचा प्रश्न जटील बनला आहे. शहर बस वाहतुकीच्या सर्व बसेस या मिनी बसेस असणे आवश्‍यक आहे. शहरातील लहान आणि अरुंद रस्त्यांवरुन 50 सिटर मोठ्या बसेस पळवण्यात काहीही अर्थ नाही. बस रूट आखताना एक सर्वव्यापी रिंगरोड असणे आवश्‍यक आहे, अशी मते समाज माध्यमातून सातारकर व्यक्त करत आहेत. जनरेटा वाढू लागल्यामुळे सातारा सिटी बस नागरिक कृती समिती स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाले आहेत.

लोकप्रतिनिधींनी घ्यावा पुढाकारया बस सेवेमध्ये दैनंदिन पासेस, मासिक पास, विद्यार्थी विशेष, महिला विशेष असे भागही करता येतील. काही बसेस वातानुकुलीतही ठेवता येतील. या सर्व बसेस बॅटरी किंवा इलेक्ट्रिक असतील तर प्रदुषणही टळेल. सातारकरांच्या हिताची काळजी असणाऱ्या सर्व नेत्यांना पक्षभेद विसरून हा प्रकल्प मार्गी कसा लावता येईल ते पहावे. 

वाढता विस्तार आणि वाढती लोकसंख्या पाहता, सातारा शहरामध्ये नव्या युगाशी सुसंगत अशी शहर बस वाहतूक सेवा सुरु होणे  गरजेचे आहे. नगर परिषद प्रशासन आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभागाच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प आकाराला येऊ शकतो. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे सातारचे असल्याने, ते या प्रश्‍नाकडे तातडीचा प्रश्‍न म्हणून पाहतील आणि सातारकरांना आगामी दिवाळीची भेट बससेवेच्या रुपाने देतील, अशी अपेक्षा आहे.  - श्रीनिवास वारुंजीकर,  प्रवर्तक, "सातारा सिटीबस नागरिक कृती समिती'

टॅग्स :Satara areaसातारा परिसर