शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

निवडणुकीची धामधूम सुरू

By admin | Published: January 17, 2017 12:07 AM

जिल्हा परिषद, पंचायत समिती : उमेदवारांच्या मुलाखती, मेळावे, बैठका

सातारा : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँगे्रस, राष्ट्रीय काँगे्रस यांच्यासोबतच भाजप, शिवसेना या पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. जिल्हाभर सर्वच पक्षांच्या बैठका, मेळावे सुरू आहेत. राष्ट्रवादीतर्फे सोमवारी वाई, महाबळेश्वर, खंडाळा व फलटण या चार तालुक्यांतील २११ उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी २७ जानेवारीपासून उमेदवारी अर्ज दाखल करायचे आहेत. याआधी सर्वच पक्षांनी उमेदवार निवडीच्या हालचाली सुरू केल्या आहेत. जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँगे्रस विरुद्ध राष्ट्रवादी असे चित्र कायम होते. आता मात्र भाजप व शिवसेना या दोन्ही पक्षांनी दंड थोपटल्याने निवडणुकीत चांगलीच रंगत आलेली आहे. राष्ट्रवादीच्या वतीने सोमवारी घेतलेल्या मुलाखतीसाठी राष्ट्रवादी भवनात मोठी गर्दी झाली होती. विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, ज्येष्ठ नेते माजी खासदार लक्ष्मणराव पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार मकरंद पाटील, माजी आमदार प्रभाकर घार्गे, पक्ष निरीक्षक सुरेशराव घुले, जिल्हाध्यक्ष सुनील माने यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादीतर्फे इच्छुक असणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. काँगे्रसनेही या निवडणुकांची जोरदार तयारी केली असून, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत २४ किंवा २५ जानेवारी रोजी काँगे्रस कमिटीमध्ये इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जातील, अशी माहिती पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार आनंदराव पाटील यांनी दिली. शिवसेना पक्षचिन्हावर ही निवडणूक लढणार असून, पक्षाचे जिल्हाध्यक्ष हर्षद कदम स्वत: मल्हारपेठ (ता. पाटण) गटातून निवडणूक लढणार आहेत. गुरुवारी (दि. १९) सातारा येथे सकाळी ११ वाजता शिवसेनेतर्फे इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत. पालकमंत्री विजय शिवतारे, उपनेते प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांची यावेळी प्रमुख उपस्थिती असेल. शिवसेनेच्याही सध्या तालुकावार बैठका सुरू आहेत. भाजपतर्फे जिल्ह्यात गटवार मेळावे सुरू आहेत. सोमवारी सायंकाळी ५ वाजता महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी करहर (ता. जावळी) येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)