सातारा: सातारा हाफ हिल मॅरेथॉन स्पर्धेला सकाळी साडे सहा वाजता सुरुवात झाली. स्पर्धेत सुमारे साडे सहा हजार स्पर्धक सहभागी झाले आहेत. सातारा पोलीस ग्राउंड ते यवतेश्वर घाट आणि पुन्हा पोलीस ग्राउंड असा स्पर्धेचा मार्ग आहे.
स्पर्धेचे उद्घाटन खासदार उदयनराजे भोसले, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख, पोलीस महासंचालक कृष्णप्रकाश यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. साडेसहा वाजता सुरू झालेल्या या स्पर्धेत प्रचंड उत्साह होता. स्पर्धा सुरू झाल्यापासून स्टार्ट पॉईंट सामन्यासाठी सुमारे दहा मिनिटांचा कालावधी लागला. विविध रंगाचे कपडे परिधान केलेले आणि प्रचंड उत्साहात असलेल्या या स्पर्धकामुळे l स्पर्धेमध्ये वेगळाच उत्साह निर्माण झाला होता. विविध वयोगटातील स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. देशभरातून स्पर्धक या स्पर्धेसाठी येत असतात. अत्यंत सुंदर दिसणारा यवतेश्वर डोंगराचा परिसर आणि मार्गात स्पर्धकांचा उत्साह वाढविणारे सातारकर यामुळे स्पर्धतील सहभाग वाढत आहे.