शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

कास पर्यटन सुधारित शुल्क आकारणीस प्रारंभ

By admin | Published: August 26, 2016 12:27 AM

उदयनराजेंच्या हस्ते उद्घाटन : फुलांना पोषक वातावरण

पेट्री : रंगीबेरंगी फुलांनी आच्छादलेले विस्तीर्ण कास पठार, फेसाळणारे धबधबे पाहण्यासाठी राज्यासह देशभरातून लाखो पर्यटक कासला भेट देत असतात. जागतिक वारसास्थळाच्या यादीत समावेश झालेले कास पठार पाहण्यासाठी शुक्रवार, दि. २६ पासून शुल्क आकारण्यात येणार आहे. सुधारित दराने शुल्क आकारणीस खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते गुरुवारी प्रारंभ करण्यात आला. गर्द हिरवळ, ठिकठिकाणी फुललेल्या रंगीबेरंगी रानफुलांचे ताटवे, रस्त्याच्या कडेला कोसळणारे छोटे-मोठे धबधबे, अधूनमधून पडणाऱ्या पावसाच्या सरी, अन् दाट धुके हे दृश्य कोण्या चित्रीकरणासाठी उभारलेला कृत्रिम सेट नव्हे तर कास पठारावर नेहमीच पाहायला मिळतो. जागतिक वारसास्थळाच्या यादीत स्थान पटकाविलेल्या कास पठाराला सतत पर्यटकांचा बहर वाढत आहे. गेल्या आठवड्यापासून अधूनमधून कडक ऊन पडत असल्याने फुलांनाही बहर येण्यास सुरुवात झाली आहे. कास पठारावर फुलांचा हंगाम सुरू होत असल्याने राज्यभरातून पर्यटक मोठ्या संख्येने सुटी दिवशी येऊ लागले आहेत. संयुक्त वन व्यवस्थापन समितीने निश्चित केलेल्या सुधारित दर आकारण्यास गुरुवारी प्रारंभ करण्यात आला. यावेळी खासदार उदयनराजे भोसले, दीपक खानिलकर, अशोक घोरपडे, राजेश शिंदे, उपवनसंरक्षक अनिल अंजनकर, सहायक वनसंरक्षक अनिल जोशी, कास, कासाणी, एकीव, आटाळी, कुसुंबी मुरा, वांजळवाडी संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य तसेच वनक्षेत्रपाल, वनरक्षक उपस्थित होते. (वार्ताहर)पहिली पावती उदयनराजेंचीसंयुक्त वन व्यवस्थापन समितीने निश्चित केलेल्या दराला शुक्रवारपासून प्रारंभ होत आहे. या मोहिमेस प्रारंभ झाल्यानंतर खासदार उदयनराजे भोसले यांच्याकडून पहिली पावती फाडण्यात आली. त्यांच्याकडून हजार रुपये घेण्यात आले.