सुपने (ता. कराड ) येथील ग्रामीण प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड लसीकरणाचा शुभारंभ जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी
पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार, पंचायत समिती सदस्या सुरेखा पाटील, डॉ. महेंद्र पाटील, डॉ. स्नेहा हुंदरे, डॉ. सुनीता खरात यांची प्रमुख उपस्थिती होती.
कोविड लसीकरण करताना डॉक्टरांनी कोणती काळजी घ्यावी व लसीकरणासाठी येणाऱ्या रुग्णांना कशी चांगली सेवा देता येईल, याबाबत जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील यांनी मार्गदर्शन केले. तसेच ४५ ते ६० वयोगटातील आजार असणाऱ्या व्यक्ती व ज्येष्ठ नागरिक यांना लस मोफत दिली जाणार आहे, याचा लोकांनी लाभ घ्यावा, असे सांगितले.
डॉ. आबासाहेब पवार म्हणाले, कोरोना आजार पुन्हा वाढतो आहे. लोकांनी मास्कचा वापर करावा, सुरक्षित अंतर ठेवून काळजी घेतली पाहिजे. कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी ही लस आहे, याचा लाभ प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत गावातील ग्रामस्थांनी घ्यावा.
.फोटो
सुपने (ता. कराड) आरोग्य केंद्रात प्रदीप पाटील, डॉ. आबासाहेब पवार, डॉ. स्नेहा हुंदारे यांनी लसीकरणाचा शुभारंभ केला.