सातारा : कोयना धरण क्षेत्रात दमदार पाऊस होत असून धरणातील पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी आज दुपारी 4 वाजता धरणाचे सहा वक्र दरवाजे दोन फुटांनी उचलून नदीपात्रात पाणी सोडण्यास प्रारंभ करण्यात आला.कोयना धरणात सध्या 77. 48 टीएमसी (76 टक्के) पाणीसाठा असून आगामी काळात धरण लवकर भरुन पूर परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी पाणी पातळी साधारण 2139 फुटावर नियंत्रित करण्यात येणार आहे.
त्यासाठी आज धरणाच्या सहा वक्र दरवाजातून 5 हजार 400 क्युसेक आणि पायथा विद्युत गृहातून 2 हजार 100 क्यूसेक या प्रमाणे एकूण 7 हजार 500 क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात करण्यात येत आहे.वक्र दरवाजे उचलून पाणी सोडण्या प्रसंगी सातारा सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता वैशाली नारकर, कार्यकारी अभियंता कुमार पाटील आदी उपस्थित होते.