सातारा : ओबीसी राजकीय आरक्षण रद्द झाले याला राज्य सरकार जबाबदार असून, आगामी निवडणुका पुढे ढकलाव्यात, अशी जोरदार मागणी भारतीय जनता पक्षातर्फे आज करण्यात आली.
भाजप जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी, सातारा तालुका अध्यक्ष राजेंद्र इंगळे यांच्या नेतृत्वाखाली सातारा येथे पोवई नाक्यावर आंदोलन करण्यात आले.
याबाबतचे निवेदन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना जिल्हाधिकारी सातारा यांच्यामार्फत पाठविण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम, पालघर व नागपूर येथील निवडणुका शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे जाहीर झाल्या. जर या आघाडी सरकारने वेळीच इम्पेरिकल डाटा कोर्टाला दिला असता तर आज आमच्या ओबीसी बांधवांवर निवडणुकीतून हद्दपार व्हायची वेळ आली नसती. पण, या शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस सरकारला ओबीसींचे आरक्षण जाणूनबुजून काढून घ्यायचे होते म्हणून त्यांनी कोर्टाला इम्पेरिकल डाटा दिला नाही.
ओबीसींचे आरक्षण संपुष्टात आले म्हणजेच या सरकारने मागासवर्गीय आयोग नेमूनसुद्धा कुठलीही कार्यवाही केली नाही. फक्त आणि फक्त ओबीसी समाजाला आशेवर ठेवून पद्धतशीरपणे निवडणुकीतून बाजूला केले म्हणून या सरकारचा ओबीसी समाजाच्या वतीने व भारतीय जनता पक्ष ओबीसी मोर्चाच्या वतीने जाहीर निषेध करतो. यापुढे ओबीसी समाजाने शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस सरकारला निवडणुकीतून हद्दपार करण्यासाठी एकजुटीने लढण्याची व या सरकारला त्यांची जागा दाखवून देण्याची वेळ आलेली आहे.
तसेच या निवेदनामार्फत अशी विनंती करतो की, जोपर्यंत राज्यात ओबीसींचे राजकीय आरक्षण लागू होत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका घेण्यात येऊ नयेत. भारतीय जनता पक्षातर्फे ओबीसीच्या जागेवर ओबीसीचाच उमेदवार दिला जाणार आहे.
या वेळी भाजप जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सुवर्णाताई पाटील, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेठवार, सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी, सातारा तालुका अध्यक्ष राजेंद्र इंगळे, सातारा जिल्हा उपाध्यक्ष ॲड. प्रशांत खामकर, राहुल शिवनामे, जिल्हा चिटणीस सुनील जाधव, महिला मोर्चा सातारा जिल्हाध्यक्ष डाॅ. सुरभी चव्हाण, अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष शैलेंद्र कांबळे, व्यापारी आघाडी जिल्हा अध्यक्ष डाॅ. सचिन साळुंखे, सिने कलाकार आघाडी जिल्हाध्यक्ष विकास बनकर, प्रज्ञा आघाडी जिल्हाध्यक्ष फत्तेसिंह पाटणकर, भटके विमुक्त आघाडी जिल्हा अध्यक्ष प्रिया नाईक, बीसी मोर्चा युवती जिल्हाध्यक्ष वनिता पवार, ओबीसी मोर्चा युवक जिल्हाध्यक्ष महेंद्र कदम, सातारा शहर सरचिटणीस प्रवीण शहाणे, जयदीप ठुसे, विक्रांत भोसले, सातारा शहर तालुका सरचिटणीस गणेश पालखे, सातारा शहर उपाध्यक्ष चंदन घोडके, प्रशांत जोशी, तालुका उपाध्यक्ष विक्रम पवार, सातारा शहर युवा मोर्चा अध्यक्ष विक्रम बोराटे, सातारा तालुका युवा मोर्चा अध्यक्ष सुजित साबळे, सातारा शहर महिला मोर्चा अध्यक्ष रीना भणगे, नगरसेवक धनंजय जांभळे, नगरसेविका सिद्धी पवार, नगरसेवक सुनील काळेकर, युवा मोर्चा जिल्हाउपाध्यक्ष किरण गोगावले, औद्योगिक आघाडी जिल्हा उपाध्यक्ष अमोल टंकसाळे, महिला मोर्चा सातारा सरचिटणीस अश्विनी हुबळीकर, हेमांगी जोशी, माजी नगरसेवक किशोर पंडित, ज्येष्ठ नागरिक आघाडी अध्यक्ष प्रकाश शहाणे, औद्योगिक आघाडी सातारा शहर अध्यक्ष रोहित साने, महिला मोर्चा सातारा शहर उपाध्यक्ष मनीषा जाधव, युवा मोर्चाचे अमोल कांबळे, विजय गाढवे, सुबोध चव्हाण, सुधीर काकडे, सुनील फडतरे, रवींद्र लाहोटी, शालन माने, सोनाली वाघमारे तसेच पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटो ओळ : सातारा येथील पवई नाक्यावर राज्य शासनाच्या विरोधात भाजपने आंदोलन केले.