सातारा : मराठा आरक्षणाबाबत राज्य शासनाने आत्मीयतेने न्यायालयात बाजू मांडावी. राज्य शासनाने याबाबत श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे.मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय आता मार्गी लागणे आवश्यक आहे. केंद्रात काम करणाऱ्या नेत्यांपासून ते राज्य सरकारमधील विविध नेत्यांना मी भेटलो आहे. सर्वांनाच मराठा आरक्षणाबाबत बोललो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावून हा विषय कसा मार्गी लावता येईल, असे स्पष्ट केले. ८ मार्च रोजी मराठा आरक्षणाबाबत न्यायालयात सुनावणी होणार आहे, या सुनावणीसाठी आत्मीयता असणारे वकील नेमावेत, अशी मागणी राज्य शासनाकडे केली आहे.
राज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनीदेखील विकासाच्या दृष्टीने प्रयत्न सुरू ठेवले आहेत, असेही खासदार उदयनराजेंनी स्पष्ट केले. जिल्हा बँकेच्या निवडणुकीबाबत फलटणचे राजे, सातारचे राजे आणि लोकशाहीतील राजे काय योजना आखतायेत, त्यांना आखू द्या, असेही त्यांनी स्पष्ट केले.