यावेळी जिल्हा कोतवाल संघटनेचे अध्यक्ष प्रकाश काशीद, विशाल भोसले, सुदर्शन चव्हाण, राजेंद्र सावंत, रमेश चन्ने, निवास काटकर, रमेश पाटील, केशव कुंभार आदी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, कोतवालांची चतुर्थ श्रेणीची कार्यवाही शासन स्तरावर पूर्ण होईपर्यंत वेतनातील अन्यायकारक भेदभाव दूर करून समान काम, समान वेतन या धर्तीवर राज्यातील सर्व कोतवालांना सरसकट पंधरा हजार रुपये वेतन द्यावे, कोतवालांसाठी शासन निर्णयाबाबत देण्यात आलेल्या नागपूर मार्गदर्शनामुळे शासन निर्णयाप्रमाणे पात्र असूनही कोतवालांना वेतनवाढ मिळत नाही. कोरोनाने मृत झालेल्या कोतवालांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर सेवेत समावेश करावा, सेवानिवृत्तीनंतर कोतवालांना कुठलाही शासकीय लाभ मिळत नसल्यामुळे सेवानिवृत्त कोतवालास दहा लाख रुपये निर्वाह भत्ता मिळावा, अशा मागण्यांचे निवेदन जिल्हा कोतवाल संघटनेच्यावतीने बाळासाहेब पाटील यांना देण्यात आले आहे.