जगदीश कोष्टी ।सातारा : नोकरीच लागत नाही म्हणून काहीजण एसटीत चालक किंवा वाहकाची नोकरी स्वीकारतात. एकदा नोकरी लागल्यावर आयुष्यभर हातात स्टिअरिंग घेणं किंवा तिकीट फाडत प्रवास करावा लागतो. यामुळे अनेकांना व्याधी जडतात; पण त्यातून सुटका होत नाही. स्टिअरिंग धरणारे हेच हात आता कार्यालयात बसून संगणक हाताळताना दिसणार आहेत.
एसटी महामंडळातील चालक, वाहक, सहायक, शिपाई आता लिपिक किंवा टंकलेखक पदावर पदोन्नती देण्याचा निर्णय झाला आहे. यासाठी लिपिक, टंकलेखक संवर्गामध्ये २५ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा परिवहन मंत्री एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली. यामुळे सातारा विभागातील शेकडो चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.
चालक, वाहकपदासाठी एकेकाळी केवळ आठवी पास अट असायची; परंतु गेल्या काही वर्षांपासून नोकºयाच उपलब्ध नसल्याने तरुणांच्या शिक्षणाचा स्तर उंचावला. ग्रामीण भागात महाविद्यालयात प्रवेश घेऊन काहीजण खासगी गाड्यांवर चालक म्हणून काम करतात. पाहता-पाहता ते पदवीधर होतात. काहीजण दहावी, बारावीत असतानाच संगणक, टंकलेखनचा अभ्यासक्रम पूर्ण करतात.
पदवीनंतर एक-दोन वेळा स्पर्धा परीक्षा दिल्या जातात; पण अपेक्षित यश न आल्यास मिळेल ती नोकरी स्वीकारली जाते. त्याचप्रमाणे राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा विभागात अनेक पदवीधर तरुण चालक, वाहकपदावर कार्यरत आहेत. या निर्णयानंतर पात्र कर्मचारी पदोन्नतीची परीक्षा देऊन लिपिक होऊ शकतात. या कर्मचाºयांमध्ये नवीन निर्णयामुळे आनंदाचे वातावरण पसरले आहे.
लांब पल्ल्याची फेरी मिळाल्यास सणवार, कुटुंबातील सदस्यांचा वाढदिवस बाजूला ठेवून कर्तव्य बजावण्यासाठी एसटी घेऊन जाणाºया कर्मचाºयांना नवीन निर्णयामुळे चार भिंतीच्या आत बसून लिपीकाचे काम करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे घेतलेल्या शिक्षणाचा फायदा होणार आहे.हाडांचा बनलाय खुळखुळासातारा जिल्ह्यातील बहुतांश भाग डोंगरी असून, अनेक ठिकाणी रस्ता उखडला आहे. एकदा नोकरी लागल्यावर त्यांना दुसरीकडे नशीब आजमावण्यासाठी संधी मिळत नाही. त्यामुळे हाडांचा खुळखुळा होतो. या निर्णयामुळे या कर्मचाºयांना कार्यालयात बसून काम करण्याची संधी मिळणार आहे.