भुर्इंज : चप्पल ही वस्तू आजही अनेकांच्या आवाक्याच्या बाहेर आहे. विशेषत: ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी विनाचप्पल शाळेची वाट तुडवतात. डांबरी सडकेचे चटके सोसत वाटचाल करणाऱ्या अशा चिमुरड्यांच्या या वेदनेवर फुंकर घालण्याचे काम येथील युवा प्रतिष्ठानने केले. प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी अशा विद्यार्थ्यांना चप्पल वाटप करून चिमुकल्या पावलांचे चटके थांबवले आहेत.गेल्या काही महिन्यांपासून युवा प्रतिष्ठानतर्फे विविध सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत. हे काम करतानाच प्रतिष्ठानच्या काही सदस्यांना विनाचप्पल शाळेत जाणारे विद्यार्थी दिसून आले. ज्यांच्या पायात चप्पल नाही, असे विद्यार्थी किती याची चौकशी शाळेत केली. त्यानंतर शिक्षकांनीही अशा विद्यार्थ्यांची माहिती घेऊन ती प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना कळविली.विद्यार्थ्यांची संख्या वयनिहाय घेऊन त्या-त्या आकारातील चप्पल घेऊन कार्यकर्ते शाळेत गेले. जेव्हा या विद्यार्थ्यांच्या पायात चप्पल आली तेव्हा त्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद अक्षरश: ओसंडून वाहत होता. सध्या उन्हाचे चटके चांगलेच वाढले आहेत. त्यामुळे या दिवसातच विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने चपलेची गरज होती. ती गरज ओळखून अध्यक्ष सुधीर भोसले यांनी केवळ याच शाळेत नव्हे तर इतर शाळांमधीलही अशा विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम राबवणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी किरण जाधव, शिवाजीराव जाधव, शरद वाघमारे, भरत मोहिते, युवा प्रतिष्ठानचे सदस्य जितेंद्र मोहिते, मंगेश वाघुलकर, गणेश जाधव, योगेश शिर्के, अजित भोसले, सूर्यकांत भोसले, संतोष मोरे, जयवंत लोखंडे, रोहित दाभाडे, राहुल वाघमारे, मुस्तकीन मणेर, संदीप धुमाळ यांसह प्रतिष्ठानचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)खूप आनंद झाला...आम्हाला कधी असं वाटलही नव्हतं की आम्हाला अशी भेट मिळेल. अचानकपणे या साऱ्या दादांनी दिलेल्या चपला आम्ही लगेच पायात घातल्या. मीच नाही, तर आम्ही सारेजण खुप खूश आहोत.- विवेक जाधव, विद्यार्थीााही, तर आम्ही सारेजण खुप खूश आहोत.- विवेक जाधव, विद्यार्थी
चिमुकल्या पावलांचे थांबले चटके
By admin | Published: March 23, 2015 9:10 PM