शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
2
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
3
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
4
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
6
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
7
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
8
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
9
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
10
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
11
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
12
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
13
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
14
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
15
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
16
Maharashtra Election 2024 Live Updates: भिवंडीतील राज ठाकरेंची सभा झाली, पण भाषण झाले नाही
17
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
18
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
19
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
20
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला

मटका अड्ड्यावर हप्ता घेणाऱ्या पोलिसांचं स्टिंग ऑपरेशन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2018 4:32 PM

'अर्थ'पूर्ण संभाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

सातारा : मटक्याच्या अड्ड्यावर छापा टाकण्यास गेलेल्या तीन पोलिसांची व्हिडीओ क्लिप बनवून एका नागरिकानं पोलीस यंत्रणेचा भांडाफोड केला आहे. या स्टिंग ऑपरेशन’मध्ये ‘साहेबांना आता तीन हजार दिले आहेत. उरलेले तीन हजार संध्याकाळी देतो,’ असं संभाषण पाहायला आणि ऐकायला येत आहे. विशेष म्हणजे, कोणालाही अटक न करता पोलीस मटक्याच्या अड्ड्यावरुन बाहेर पडतानाही दिसत आहेत.दोन दिवसांपूर्वी राजवाडा परिसरातील एका मटका अड्ड्यावर तीन पोलीस छापा टाकण्यासाठी गेले होते. त्यावेळी एका व्यक्तीनेआपल्या मोबाईलवर त्यांचे चित्रीकरण केले. आतमध्ये दोन पोलीस गेले होते. तर बाहेर एका पोलिसासोबत चर्चा सुरू होती.‘कितीही केले, तरी मटका अड्डे सुरूच राहणार, आता फक्त एकच सुरू आहे,’ असं हा पोलीस म्हणतो आहे.  इकडच्या-तिकडच्या गप्पा मारल्यानंतर तो पोलीस कर्मचारी आतमध्ये सुरू असलेल्या मटका अड्ड्याकडे जातो. त्याच्या पाठोपाठ चित्रीकरण करणारी व्यक्तीही जाते. त्यावेळी आतमध्ये सुरू असलेले संभाषण ऐकायला येते. ‘पाचला पन्नास..’ त्यानंतर मध्येच एकजण बोलतो, ‘अजून साहेबांचे पैसे दिले नाहीत. जे आता तीन हजार दिले आहेत; पण उरलेले तीन हजार संध्याकाळी देतो,’ या संभाषणानंतर एक पोलीस कर्मचारी एका व्यक्तीला ‘बाहेर ये’ असे सांगतो.

या चित्रफितीत मटका घेणारे आणि खेळणारेही दिसतात. भिंतीवर चिठ्ठ्या अडकवलेल्या दिसतात. मात्र, या मटक्याच्या साहित्याकडे डोळेझाक करून तिन्हीही पोलीस बोलत-बोलत बाहेर येतात. ‘फार चिंगुस आहेत,’असा शेराही त्यावेळी एक व्यक्ती पोलिसांकडे पाहून मारते. दोन पोलीस चालत दुसरीकडे जातात, तर एक पोलीस गाडीवर बसून मोबाईलवर बोलत-बोलत निघून जातो. 

टॅग्स :PoliceपोलिसSatara areaसातारा परिसर