पेट्रोल पंपाजवळ असणाऱ्या इमारती १४ हजार लिटर बेकायदेशीर डिझेलचा साठा
केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध लोणंद पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात
आला आहे. याबाबत लोणंद पोलिसांकडून मिळालेली माहिती
अशी की, लोणंद येथील गोठेमळा या ठिकाणी असणाऱ्या कमल संपत्ती पेट्रोल
पंपाच्या दक्षिणेस असणाऱ्या अण्णा सोनवलकर यांच्या इमारतीमध्ये सूरज
जालिंदर शिंदे (रा. तांबवे) व रोहन राजेंद्र वायकर (रा. तरडगाव, ता. फलटण)
यांनी भाड्याने घेतलेल्या गाळ्यांमध्ये विनापरवाना डिझेलचा साठा केल्याची माहिती लोणंद पोलिसांना मिळाल्यानंतर लोणंद पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी मंडलाधिकारी सूरज पोळ यांच्यासमवेत छापा टाकला असता या ठिकाणी १ लाख ३५ हजार रुपयांचे चौदाशे लिटर डिझेल आढळून आले. बेकायदेशीररीत्या ज्वलनशील डिझेलचा साठा केल्याबद्दल दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस
हवालदार अविनाश नलावडे करीत आहेत.