रेठरे बुदू्रक (जि. सातारा) : रेठरे बुद्रूक, ता. कºहाड परिसरात गत काही दिवसांपासून चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. गत काही दिवसांपूर्वी येथील बंद असलेल्या बंगल्यांना चोरट्यांनी टार्गेट केले होते. दरवाजाचे कुलूप व कोयंडा लोखंडी कटावणीच्या सहाय्याने तोडून त्यांनी तिजोरीतील दहा हजाराची रोख रक्कम व पाच तोळ्याचे दागिणे लंपास केले होते. तसेच पहाटेच्या सुमारासही घरफोडी करण्याची घटना घडली होती. याबाबतची नोंद कºहाड तालुका पोलीसांत करण्यात आली आहे. दरम्यान, चोरी करणारे चोरटे सीसीटिव्ही कॅमेरात कैद झाले असून त्यांच्या आधारे पोलीस तपास करीत आहेत. गावातील मारूती कापूरकर यांचा गणेशनगर येथे बंगला आहे. ते बंगल्याला कुलूप लावून आपल्या पत्नीसोबत काही दिवसांसाठी गुजरातला मुलाला भेटण्यासाठी गेले होते. त्यामुळे घरात कोणी नसल्याची संधी साधत चोरट्यांनी घरात प्रवेश करीत चोरी केली. तसेच यापूर्वी झालेल्या चोरीच्या अनेक घटना अद्याप उघडकीस आलेल्या नाहीत. गेल्यावर्षी धनाजी कालेकर यांच्या बंगल्यात जबरी चोरी झाली होती. तसेच डॉ. राजेंद्र पवार यांचा बंगला फोडून चोरट्यांनी भरदिवसा सोने, चांदी व रोख ऐवज लंपास केला होता. या घटना ताज्या असतानाच रेठºयात पुन्हा एकदा चोरट्यांनी एका रात्रीत चार घरे फोडून दहशत निर्माण केली आहे. रेठरे बुद्रूक हे कृष्णाकाठचे सधन गाव म्हणून परिचित आहे. गावाचा परिसर मोठा आहे. गावापासून शेती लांब असल्यामुळे बºयाच कुटूंबानी आपली घरे शेतात बांधली आहेत. त्यामुळे गावातील घरे बºयाचवेळा बंद असतात. तसेच मुलांचे शिक्षण व नोकरीनिमित्त काही लोक बाहेरगावी वास्तव्यास असतात. काहींना सातत्याने अनेक कामनिमित्त बाहेर जावे लागते. या कालावधीत घरे बंद असतात. याचा फायदा चोरट्यांनी घेतला असून दिवसेंदिवस चोºयांचे सत्र वाढतच चालले आहे. |
घराला कुलूप लाऊनही मनात धास्ती!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2017 5:56 PM
रेठरे बुदू्रक (जि. सातारा) : रेठरे बुद्रूक, ता. कºहाड परिसरात गत काही दिवसांपासून चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.गत काही दिवसांपूर्वी येथील बंद असलेल्या बंगल्यांना चोरट्यांनी टार्गेट केले होते. दरवाजाचे कुलूप व कोयंडा लोखंडी कटावणीच्या सहाय्याने तोडून त्यांनी तिजोरीतील दहा हजाराची रोख रक्कम व ...
ठळक मुद्देचोरट्यांची भिती रेठरे बुद्रूक परिसरात चोºयांचे सत्र सुरूचपोलिस गस्त वाढविण्याची मागणी