सातारा : दुचाकीवर मागे बसलेल्या महिलेचा स्टोल चाकात अडकल्यामुळे महिला रस्त्यावर आदळली. यामध्ये डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने संबंधित महिलेचा मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी दुपारी दोन वाजता कदमबाग परिसरात झाला. सारिका अभिजित देशमुख (वय २६, रा. शिवथर, ता. सातारा) असे मृत महिलेचे नाव आहे.
घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सुनील हिरोजी साबळे (२४, रा. शिवथर) हा चुलत बहीण सारिका देशमुख व तिची मुलगी अन्वी अभिजित देशमुख (४) या दोघींना घेऊन शिवथरहून साताऱ्याला दुचाकी (एमएच ११ झेड ४३५५)वरून येत होते. त्यांची दुचाकी शुक्रवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास कदमबाग पेट्रोल पंपासमोर आली असता सारिका यांच्या गळ्यातील ओढणी गाडीच्या मागील चाकात अडकली. त्यामुळे सारिका व तिची मुलगी अन्वी दोघी चालत्या गाडीवरून रस्त्यावर पडल्या. यात सारिकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तिला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता उपचारपूर्वीच तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार किशोर जाधव करीत आहेत.अपघात सीसीटीव्हीत कैदशिवशाही बसने धडक दिल्यामुळे अपघात झाल्याचे सांगितले जात होते. पण अपघातस्थळासमोरच कदम पेट्रोल पंप आहे. या पंपावर ठिकठिकाणी सुरक्षिततेच्या कारणाने सीसीटीव्ही कॅमेरे बसविलेले आहेत. या कॅमेºयांमध्ये हा अपघात कैद झाला आहे. यामध्ये अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होत असल्याने पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेºयांमधील फुटेज ताब्यात घेतले आहेत.साताºयातील कदमबाग पेट्रोलपंपासमोर शुक्रवारी दुपारी स्टोल चाकात अडकल्याने अपघात झाला.