सातारा: संचारबंदी असतानाही अनेक बार मालक मागच्या दरवाजाने दुकानातील स्टॉक परहस्ते विकत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे आता उत्पादन शुल्क विभागाने चोरून विक्री झालेला स्टॉक मोजण्याचा निर्णय घेतला आहे. आता बारमालक अस्वस्थ झाले आहेत. कारवाई टाळण्यासाठी वशिलेबाजी आतापासूनच सुरू झाली आहे
जिल्'ात 22 मार्चपासून संचारबंदी आहे. सर्व दुकाने बंद करण्यात आली आहेत. वाईन शॉप, बियरबार, हॉटेलही बंद आहेत. मात्र असे असतानाही अनेक बारचालक मागच्या दरवाजाने मद्याचा साठा परस्पर विकत असल्याचे समोर आले आहे. लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वी उत्पादन शुल्क विभागाने वाईनशॉप बिअरबार दुकानांना सील ठोकले मात्र काहीजण मागच्या दरवाजाने दारू विक्री करत असल्याचे समोर आले. मद्याचे दर दुपटीने वाढविण्यात आले आहेत. हा सारा गोलमाल रात्रीच्या सुमारास केला जात आहे. बीअरबार व दुकानाचा मुख्य दरवाजा सील केला असला तरी दुकानातही काही खुशकीचे मार्ग आहेत.
या मार्गातून दुकानात प्रवेश करून मद्याचा साठा चोरीछुपे बाहेर काढला जात आहे. एरवी एखादी दोनशे रुपयाला मिळणारी बॉटल हजार रुपयाला विकली जात आहे. त्यामुळे अवैध मार्गाने पैसे कमवण्याचा गोरखधंदा काहींनी या लॉकडाऊनच्या काळात सुरू ठेवला आहे. अशांवर आता उत्पादन शुल्क नजर ठेवून असून येत्या काही दिवसात दुकानातील पूर्वी आणि सध्याचा असलेला स्टॉक मोजला जाणार आहे.
उत्पादन शुल्क विभागाने सर्व वाईन शॉप व बियर बार चालकांना आपल्या दुकानातील रोजचा साठा त्याची विक्री आणि आवक किती झाली हे सांगणे बंधनकारक केले आहे त्यामुळे आता या लॉकडाऊनच्या काळामध्ये छुप्या मार्गाने मोठ्या प्रमाणात दुकानातून स्टॉप बाहेर विकला गेला आहे. ज्यावेळेस उत्पादन शुल्कचे अधिकारी हा स्टॉक मोजण्यास दुकानात येतील त्यावेळी दुकानात स्टॉक नक्कीच कमी असणार आहे, हे माहीत असलेल्या दुकानदारांनी आता कारवाई टाळण्यासाठी उत्पादन शुल्क कर्मचारी अधिकाऱ्यांशी सेटिंग लावण्या सुरुवात केली आहे.दुकानातील स्टॉक कमी दिसल्यानंतर कारवाई होऊ नये म्हणून अधिकाऱ्यांना आर्थिक प्रलोभने ही दाखवली जातील.त्यामुळे नेमकी किती दुकानदारावर स्टॉक कमी असल्याने कारवाई होईल, हे आता पाहावे लागणार आहे.जप्त केलेला ऐवज जातोय कुठे...उत्पादन शुल्क विभागाकडून सध्या अनेक ठिकाणी अवैद्य मार्गाने वाहतूक होणाºया दारू साठ्यावर कारवाई केली जात आहे हा साठा जप्त केल्यानंतर नेमका कुठे ठेवला जातो आणि पुढे या साठ्याचे काय होते हे मात्र गुलदस्त्यातच आहे रेकॉर्डवरील साठा सुस्थितीत राहील मात्र जो साठा रेकॉर्डर आला नाही तो साठा जाते कुठे असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.