सातारा : राष्ट्रवादी व काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या येथील जिल्हा कार्यालयावर अज्ञातांनी गुरुवारी सकाळच्या वेळेत दगडफेक केली. यावेळी सरकारच्या विरोधात निषेधाच्या घोषणाही देण्यात आल्या. पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी पोलिस फोर्स दाखल झाली.सुप्रीम कोर्टाने बुधवारी मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर मराठा आरक्षणासाठी झगडणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. या पार्श्वभूमीवरच गुरुवारी दोन्ही पक्षांच्या कार्यालयावर दगडफेक झाल्याचे समजते.दरम्यान या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अतिरिक्त जिल्हा अधिक्षक पोलीस अधीक्षक धीरज पाटील पोलीस पाऊस घेऊन राष्ट्रवादी कार्यालयात दाखल झाले. कार्यालयाला सुरक्षा देण्यात आली असून दगडफेक करणाऱ्यांची धरपकड करण्यासाठी पोलिसांनी धावाधाव सुरू केलेली आहे.काँग्रेसतर्फे शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून घटनास्थळा वरचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासली आहेत. दगडफेक करणाऱ्यांचा पोलिस लवकरच शोध घेतील अशी माहिती दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी दिले आहे.दरम्यान राष्ट्रवादी, व काँग्रेस पक्षांच्या कार्यालयांवर केलेली दगडफेक भाजपचे षड्यंत्र आहे. समाजात दुही पसरवण्याचे राजकारण कोणीच खपून घेणार नाही, असे स्पष्टीकरण आमदार शशिकांत शिंदे यांनी केले आहे.गृहराज्यमंत्र्यांच्या बंगल्यासमोर गोवऱ्या पेटवल्याराज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांच्या पोवई नाका येथील कोयना दौलत या निवासस्थानासमोर जाणाऱ्या रस्त्यावर अज्ञात लोकांनी गुरुवारी सकाळी गोवऱ्या पेटवल्या. पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी पोलिस दाखल झाले. या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले आहेत.
ज्यानी कोणी हे समाज विघातक , निंदनीय कृत्य केले त्या अज्ञात व्यक्तींच्या विरोधात जिल्हा सरचिटणीस ऍड. दत्तात्रय धनावडे आणि अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष - मनोज तपासे यांनी पोलीस स्टेशनला रीतसर तक्रार दाखल केली आहे. आजची परिस्थिती कोरोना उद्रेकाची आहे. अश्या परिस्थितीत काही समाजकंटकांनी समाजात तेढ निर्माण होईल असे कृत्य केले आहे पोलीस त्यांचा नक्की शोध घेतील.-डॉ. सुरेश जाधवअध्यक्ष,सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी
मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात मोठ्या ताकतीने बाजू मांडली होती. दुर्दैवाने शासनाला त्यात यश आलेले नाही. मात्र काही लोक राजकीय हेतूने पक्ष्यांच्या अधिकृत कार्यालयांवर हल्ला चढवत आहेत. हे आम्ही कधीही खपवून घेणार नाही. पोलिसांना हल्लेखोरांची नावे कळालेली आहेत, ते लवकरच ताब्यात घेतील.-आमदार शशिकांत शिंदे