ढेबेवाडी ते पाटण रस्त्याचे रुंदीकरणाचे काम मंदुळकोळेतील भवानीमाता मंदिरापर्यंत आहे. या रस्त्याला दोन्ही बाजूला गटार आहे. मात्र, ठेकेदाराने गटाराची उंची अनेक ठिकाणी कमीजास्त केली आहे. त्यामुळे गटार प्रवाहित राहत नाही. शिवाय, रस्त्याचे कामही दर्जेदार झालेले नाही. मुख्य चौकातील रस्त्याचे काम वर्षभर रखडले. त्यानंतर रुंदीकरणाचे काम लवकरात लवकर करावे, अशी मागणी करूनही या ठेकेदाराने याची दखल न घेता काम बंद ठेवले. याबाबत संबंधित बांधकाम विभागानेही त्याची दखल घेतली नाही. वरिष्ठांनी संबंधित ठेकेदारावर योग्य ती कारवाई करावी. अन्यथा, तीव्र आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा सरपंच अमोल पाटील यांनी दिला आहे.
दरम्यान, या रस्त्याच्या रुंदीकरण कामावेळी संबंधित ठेकेदाराने चुकीच्या पद्धतीने मापे टाकली असून त्याचीही चौकशी करण्याची मागणी रस्त्यानजीक असलेल्या इमारतीच्या मालकांनी केलेली आहे.
फोटो : १०केआरडी०२
कॅप्शन : ढेबेवाडी येथील मुख्य चौकात खडी पसरून ठेकेदार पसार झाला असून रस्त्याचे काम रखडले आहे. (छाया : बाळासाहेब रोडे)