पाचवड : ‘हा नाश थांबवा भूमातेचे तन-मन जळते आहे, ही वसुंधरा जनसंख्येच्या भाराने रडते आहे’ अशी साद घालत तसेच स्वच्छ भारत अभियान, वसुंधरा बचाव, पाणी अडवा पाणी जिरवा असा संदेश देत मुंबई ते बेंगलोर सायकलवारी करणाºया युवक बिरादारीच्या तीस युवकांनी किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्यास भेट दिली.क्रांतीभाई शहा संस्थापक असलेल्या युवक बिरादरी गेल्या पाच दशकांपासून देशात नाविण्यपूर्ण उपक्रमाद्वारे समाजप्रबोधन, पर्यावरण संवर्धन, स्वच्छता आदी समाज जीवनाशी निगडित विविध विषयांवर जनजागृतीचे काम करीत आहे. इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त यंदा युवक बिरादरीने विविध संदेशांसह सायकल रॅलीचे आयोजन केले आहे. या रॅलीतील युवकांनी भुर्इंज, ता. वाई येथील कारखान्यास भेट देऊन साखर कारखाना, वीजनिर्मिती प्रकल्पासह कारखान्याने सभासद हिताच्या राबविलेल्या विविध उपक्रमांना भेट देऊन माहिती घेतली. २६/११ शहीद स्मारकाला भेट देऊन अभिवादन केले.
झाडे लावा, पर्यावरण वाचवा व पाणी अडवा हे आमच्या युवक बिरादरीच्या अजेंड्यावरील प्रमुख आणि महत्त्वाचे विषय आहे. मदन भोसले यांच्या नेतृत्वाखालील किसन वीर साखर कारखान्याने हजारो झाडांची लागवड करून वृक्ष लागवड व पर्यावरण संवर्धनाला आणि शेततळी उभारून पाणी अडवा-पाणी जिरवा या संकल्पनांना मूर्त स्वरूप दिल्याचे प्रत्यक्ष पाहून समाधान वाटले, असे सायकल रॅलीचे नेतृत्व करणाºया आदित्य पंडित याने नमूद केले. तसेच कारखान्याने केलेल्या चौफेर प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. या सायकल रॅलीचे स्वागत संचालक चंद्रकांत इंगवले, नंदकुमार निकम, फायनान्स मॅनेजर टी. जी. पवार व को-जन इन्चार्ज धीरज वाघोले यांनी केले.भुर्इंज, ता. वाई येथील किसन वीर सहकारी साखर कारखान्यास युवक बिरादरीच्या मुंबई-बेंगलोर सायकल वारीतील युवकांनी भेट दिली. यावेळी संचालक चंद्रकांत इंगवले, नंदकुमार निकम, टी. जी. पवार, धीरज वाघोले व कर्मचारी उपस्थित होते.