सातारा : शेतकºयांना संपूर्ण कर्जमुक्ती मिळावी व स्वामिनाथन आयोगाची त्वरित अंमलबजावणी करावी, या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सर्व शेतकरी संघटनांच्या वतीने सोमवारी पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी काहीकाळ रास्ता रोको करण्यात आला. यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन सोडून दिले.
शासनाने कर्जमाफीच्या निकषात बदल केले. पण निकषांच्या जंजाळात अद्यापपर्यंत कर्जमाफी जाहीर झालेली नाही. तसेच स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याबाबत विधानसभेत चर्चादेखील झाली नाही. त्यामुळे सुकाणू समितीने स्वातंत्र्यदिनी मंत्र्यांना ध्वजवंदन करू न देण्याचा निर्णय घेतला आहे.
स्वातंत्र्यदिनानिमित्त पालकमंत्री विजय शिवतारे सोमवारी सातारा मुक्कामी येत आहेत. या पार्श्वभूमीवर आंदोलन करण्यात आले. यामध्ये साताºयात वाढे फाटा येथे सकाळी अकराच्या सुमारास रास्ता रोको करण्यात आला. तसेच कºहाडातील कोल्हापूर नाका, निसरे फाटा व पुसेगाव येथेही आंदोलन करण्यात येणार आहे.
आंदोलनात साताºयातील शेतकरी संघटना, बळीराजा शेतकरी संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटना सहभागी झाले. साताºयातील वाढेफाटा येथे सोमवारी सकाळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन केले. बळीराजा शेतकरी संघटना कºहाडमध्ये कोल्हापूर नाका व निसरे फाटा या दोन ठिकाणी रास्ता रोको करणार आहे.
वाहतूक सुरूच
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर वाढेफाटा येथे आंदोलन सुरू असतानाच एका लेनवरून वाहतूक सुरू होती. यावेळी पोलिसही बघ्याची भूमिका घेत होते. त्यामुळे संतप्त आंदोलकर्त्यांनी वाहतूक न थांबविल्यास दगडफेक करण्याचा इशारा दिला. त्यानंतर वाहतूक थांबविण्यात आली.