पुसेसावळी : अध्यात्मिक वारसा असलेल्या पुसेसावळी येथील विठ्ठल-रखुमाई मंदिरात एकादशीस भजन करण्यास अडथळा आणून शिवीगाळ व खून करण्याची धमकी दिल्याप्रकरणी दोषींवर गुन्हा नोंद करावा, या मागणीसाठी भजनी मंडळाने रास्ता रोको केला. खटाव तहसीलदारांच्या आश्वासनानंतर हा रास्ता रोको मागे घेण्यात आला.
याबाबत विठ्ठलदेव ट्रस्टने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दर एकादशीला विठ्ठल मंदिरात भजन, कीर्तन असते. परंतु ५ जुलैरोजी भजनी मंडळातील काही वारकरी मंदिरात भजनास आले होते. त्यावेळी महेंद्र माने व त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींनी भजनी मंडळास दमदाटी, शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी दिली. यापुढे मंदिरात यायचे नाही, असे धमकावले.
या घटनेचा निषेध म्हणून वारकरी सांप्रदायाच्यावतीने पुसेसावळी येथे टाळ-मृदंगाच्या गजरात रास्ता रोको करून दोषींवर कडक कारवाईची मागणी करण्यात आली.
यावेळी प्रशासनाच्यावतीने तहसीलदार किरण जमदाडे यांनी निवेदन स्वीकारून लवकरच यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. वडगावचे मठाधिपती विठ्ठल स्वामी महाराज, माजी सरपंच सूर्यकांत कदम, अरविंद कांबळे, श्रीकांत पाटील, अभिजित वीर, सुयश भंडारे, प्रदीप राऊत, संग्राम माळी, संजय जमदाडे, विशाल कुंभार, उदय माळवे, आनंदा गुरव, बाळासोा दळवी, अमोल कदम, सतीश सोलापुरे व ग्रामस्थ उपस्थित होते.
या निवेदनावर लहू कदम, विजय देशमाने, नितीन वीर, महेश कारंडे, राजेंद्र माळवे यांच्या सह्या आहेत.
फोटो आहे...