कोरेगाव : शहरातील आझाद चौक परिसरात गेले तीन दिवस पाणीपुरवठा होत नसल्याने महिला व युवकांनी बुधवारी रस्त्यावर पाण्याची भांडी ठेवत रास्ता रोको आंदोलन केले.
आझाद चौकासह शहरातील सर्वच भागांत गेले काही दिवस झाले अतिशय कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. बऱ्याचवेळा दूषित पाणीपुरवठा होत आहे.
बुधवारी सकाळपासून पाणी न आल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात होता. आझाद चौक-बाजारपेठ रस्त्यावर महिलांसह नागरिकांनी पाण्याची भांडी रस्त्यावर मांडून रास्ता रोको केला. नगरपंचायतीविरोधात घोषणाही दिल्या.
या आंदोलनाची माहिती पोलीस पाटील दीपक शिंदे यांनी दिल्यानंतर मुख्याधिकारी विजया घाडगे आंदोलनस्थळी दाखल झाल्या. त्यांनी नागरिकांची समस्या लक्षात घेऊन पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांना सूचना देऊन पाणी सोडण्याची व्यवस्था केली.
माया कुदळे, लीलावती निंबाळकर, वैशाली जाधव, सीमा राऊत, अरुणा माने, भाग्यश्री माने, मीना वीरकर, उषा भुजबळ, प्रतिभा पंडित, लता बनसोडे, सुनीता राऊत, पृथ्वीराज बर्गे, महेश बर्गे बापू, विनोद बर्गे, करण पंडित, गणेश बनसोडे, रवींद्र शेट्टी, सदाभाऊ राऊत, नीलेश शिंदे, अमर माने, महेश बनसोडे, उमेश शिंदे, कविराज पंडित, विक्रांत शिंदे, सुरज राऊत, सागर राऊत, गणेश वाघ, महेश भुजबळ आदींनी आंदोलनात भाग घेतला.