कऱ्हाड : सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या उसास थकित एफआरपीसह दोनशे रुपयांची रक्कम देणे या मागणीसाठी शनिवारी दुपारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कऱ्हाडला कृष्णा कॅनॉल येथे कऱ्हाड-विटा मार्गावर सुमारे एक तास रास्ता रोको आंदोलन केले.यावेळी कामगार संघटनेचे नेते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अनिल घराळ, योगेश झांबरे, प्रसाद धोकटे, सुभाष नलवडे, अशोक जाधव, सुदाम चव्हाण, सुरेश खोचरे, लालासो साळुंखे, अक्षय जगदाळे आदींसह हजारो शेतकरी कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी आंदोलनास कऱ्हाड तालुका वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड, पोलीस उपअधीक्षक नवनाथ ढवळे आदींची उपस्थिती होती. यावेळी संघटनेच्या पदाधिकारी यांनी केलेल्या रस्ता रोकोत कऱ्हाड ते कृष्णा कॅनॉल नाका दरम्यान वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या
ऊस एफआरपी मागणीसाठी कऱ्हाड-विटा मार्गावर रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2019 1:58 PM
सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या उसास थकित एफआरपीसह दोनशे रुपयांची रक्कम देणे या मागणीसाठी शनिवारी दुपारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कऱ्हाडला कृष्णा कॅनॉल येथे कऱ्हाड-विटा मार्गावर सुमारे एक तास रास्ता रोको आंदोलन केले.
ठळक मुद्देऊस एफआरपी मागणीसाठी कऱ्हाड-विटा मार्गावर रास्ता रोको 'स्वाभिमानी' चा रास्ता रोको, कार्यकर्ते आक्रमक