शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळाली तिसरी महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
2
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
3
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
4
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
5
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
6
तिरुमला तिरुपती लाडू वाद: प्रकाश राज यांचा DCM पवन कल्याण यांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
7
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
8
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
9
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
10
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
11
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ
12
TV वर खूप नाव कमावलं पण मोठ्या पडद्यावर चालली नाही जादू; प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलं का?
13
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)
14
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
15
IND vs BAN : Rishabh Pant चे झंझावाती शतक! गर्लफ्रेंड ईशाने मानले आभार, म्हणाली...
16
"गोली का जवाब गोले से...!"; गृह मंत्री अमित शाह यांची कश्मिरात गर्जना; विरोधकांवरही निशाणा
17
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
18
LLC 2024 : इरफान पठाणची जादू अन् विजयी सलामी; जुन्या आठवणींना उजाळा, भज्जीचा संघ हरला
19
BSNL नं जिओ, एअरटेल, Vi ला दिला 'जोर का झटका'; एकाच महिन्यात वाढले लाखो ग्राहक
20
'खोसला का घोसला'मधील लोकप्रिय अभिनेत्याचा भीषण अपघात, ICU त उपचार सुरु

जड शब्द वापरून बुद्धी असल्यासारखे दाखविणे बंद करा: उदयनराजे

By admin | Published: November 18, 2016 11:09 PM

आमदारांच्या विचारांची बैठकच सेटलमेंट, भ्रष्टाचार, खंडणी याच शब्दांच्या वर्तुळात

सातारा : ‘सर्वसामान्य उमेदवार आणि राजघराण्यातील उमेदवार हा बुद्धिभेद नाही तर वस्तुस्थिती आहे. उगाच बुद्धिभेदासारखे जड शब्द वापरून आपण फार बुद्धीचे आहोत, असे दाखवणे बंद करा. करंजे प्रभागातील उमेदवार तांत्रिक कारणाने पुरस्कृत केला आहे. आमदारांच्या विचारांची बैठकच सेटलमेंट, भ्रष्टाचार, खंडणी याच शब्दांच्या वर्तुळात मर्यादित असल्याने आर्थिक तडजोड, खंडणी, भ्रष्टाचार या पलीकडे त्यांना काहीच दिसत नाही,’ अशी सणसणीत चपराक सातारा विकास आघाडीचे अध्यक्ष, खासदार उदयनराजे भोसले यांनी लगावली. सातारा विकास आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार माधवी कदम आणि प्रभाग ५ मधील नगरसेवकपदाच्या उमेदवारांच्या प्रचारादरम्यान आयोजित एका बैठकीत खासदार उदयनराजे भोसले नागरिकांशी हितगुज केले. त्यावेळी ते बोलत होते. ‘कावीळ झालेल्या व्यक्तीला सर्व जग पिवळे दिसते, तसेच काहीसे आमदारांचे झाले आहे. ते सतत खंडण्या, सेटलमेंट, भ्रष्टाचार यामध्येच गुरफटले असल्याने त्यांना सगळीकडेच खंडणी, सेटलमेंट आणि भ्रष्टाचार दिसत असावा. कार्यकर्त्यांना नगरसेवक म्हणून संधी देताना, सामाजिक आरक्षणाशिवाय संभाव्य उमेदवाराचे चारित्र, समाजामधील त्याचे स्थान, समाजकार्याची तळमळ, निवडून येण्याची क्षमता आदी बाबींचा प्रामुख्याने विचार करूनच सर्वांनुमते आम्ही उमेदवारी दिलेली आहे. यामध्ये समाजकार्याची तळमळ आणि चारित्र, निवडून येण्याची क्षमता यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. आम्ही सेटलमेंट करून करंजे येथील उमेदवार पुरस्कृत केला, असा आरोप करणाऱ्यांनी मात्र खंडणी, जबरी मारहाण, विनापरवाना हत्याराने सार्वजनिक ठिकाणी गोळीबार करून दहशत निर्माण करणे, सार्वजनिक शांततेचा भंग, असे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या बाळू खंदारे नामक व्यक्तीला अधिकृतपणे नगरविकास आघाडीची उमेदवारी दिली आहे. वारांगना व्यवसायास हातभार लावल्याबद्दल गुन्हा दाखल असलेल्या योगेश चोरगे या व्यक्तीला त्यांनी त्यांच्या आघाडीच्या माध्यमातून पुरस्कृत केले आहे. यावरून त्यांनी नैतिक अध:पतनाचा तळ गाठला आहे,’ असेही उदयनराजे भोसले म्हणाले. त्यांची वैचारिक पातळीच खंडणी, भ्रष्टाचार याच वर्तुळात असल्याने आणि सातत्याने तोच विचार जनतेला लुटण्यासाठी करीत असल्याने त्यांनी गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तीला नगराच्या सेवक पदाची संधी देणे साहजिकच आहे. तथापि, हेच लोक चोराच्या उलट्या बोंबा मारतात याचेच हसू येते. याच आमदारांच्या नेतृत्वाखालील अजिंक्यतारा बँकेच्या मॅनेजरपदावर काम करणाऱ्या जयेंद्र जाधव व्यक्तीची मानसी या नावाची व इतर नावाची कोट्यवधींची तारांकित हॉटेल्स बँक बुडत असताना उभारली जातात याचा अन्वयार्थ काय असावा, असा सवालही त्यांनी केला. (प्रतिनिधी) नगरविकास आघाडीचे ४० शर्विलक मैदानात... ‘काहीही करून ‘बाय हुक आॅर क्रुक’ सत्ता मिळविणे व ती स्वत:च्या स्वार्थासाठी वापरणे ऐवढाच अजेंडा नगरविकास आघाडीकडे आहे. त्यांच्या अजेंड्यातून ते सातारकरांना दाखवत असलेली छानछान स्वप्ने या परिकल्पना आहेत हे सर्वांनी जाणले आहे़ या कल्पना कधीही सत्यात उतरत नाहीत़ आमच्या उमेदवारांना कठपुतळे संबोधणाऱ्यांनी त्यांचे जे ४० शर्विलक मैदानात उतरविले आहेत़ ते कोणाचे कठपुतळे आहेत?,’ असा खणखणीत सवाल सातारा विकास आघाडीचे नेते खासदार उदयनराजे भोसले यांनी केला आहे. सातारा नगरपालिका निवडणुकीनिमित्त नागरिकांच्या गाठीभेटी कार्यक्रमात ते बोलत होते़ खंडणी पालिका करायची आहे का? ‘आमदारांना सातारा शहराचा काय विकास करायचाय याची झलक अनेक उदाहरणावरून दिसते. त्यांच्या हातात सत्ता देऊन सातारकरांना नगरपालिकेची खंडणी पालिका करायची आहे का ? असा प्रश्न आता सातारकरच त्यांना ठिकठिकाणी विचारतील,’ असेही खासदार उदयनराजे भोसले यांनी बोलताना स्पष्ट केले.