फलटण : फलटण शहर व परिसरात आज, शुक्रवारी दुपारी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसाचे पाणी अनेकांच्या घरात घुसून प्रापंचिक साहित्याचे नुकसान झाले. तर शहरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले होते, तर ठीकठिकाणी झाडे कोसळून पडली.कडक उन्हामुळे नागरिक हैराण झाले होते. सर्वांना पावसाची प्रतीक्षा होती. आज सकाळपासूनच हवेमध्ये तीव्र उष्मा जाणवत होता. दुपारीनंतर ढग दाटून आले अन् जोरदार वाऱ्याला सुरुवात झाली. अन् पावसाने हजेरी लावली. अचानकच बरसलेल्या या पावसामुळे नागरिकांची ताराबंळ उडाली. पावसाने चांगलाच तडाका दिल्याने अनेकांच्या घरात पाणी शिरले. अनेक रस्ते विशेषता रिंग रोड पाणी खाली गेला होता. यामुळे वाहनधारकांना कसरत करत वाहने चालवावी लागली.
वादळी वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडली होती. तहसील कार्यालयाच्या आवारातील मोठे झाड पडल्याने रस्ता बंद झाला होता. झिरपवाडी गावाच्या हद्दीतील एका पेट्रोल पंपाचे छत कोसळून पेट्रोल पंपावर पडल्याने पंपाचे नुकसान झाले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. विद्युत पुरवठा बराचवेळ खंडित झाला होता.