शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
3
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
4
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
5
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
6
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
7
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
8
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
9
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
10
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
11
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
12
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
13
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
14
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
15
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
16
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
17
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
18
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
19
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
20
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!

दिवसभर रस्त्यात... रात्री गोठ्यात!

By admin | Published: July 12, 2015 9:51 PM

सांगा रस्ता कुणाचा? : मोकाट अन् पाळीव जनावरांचा शहरातील रस्त्यांवर वावर; वाहतुकीला अडथळा, अपघाताचीही शक्यता

प्रदीप यादव - सातारा -शहरातील रस्त्यांना लागलेले खड्ड्यांचे ग्रहण सुटता सुटेना. छोट्या-मोठ्या कामांसाठी नेहमी रस्ते खोदले जातात, त्यामुळे खड्डेमय रस्त्यावरील प्रवास सातारकरांच्या अंगवळणी पडला आहे. मात्र, आता नवीनच समस्या निर्माण झाली असून मोकाट अन् पाळीव जनावरे दिवसभर शहरातील रस्तोरस्ती भटकत असतात. परिणामी वाहतुकीला अडचण निर्माण होण्याबरोबरच जनावरांच्या जिवालाही धोका पोहोचू शकतो.सातारा शहराचा विकास होत असताना पाळीव जनावराना फिरण्यासाठी आता जागा उरलेली नाही. शहराच्या बाहेर जनावरे चरावयास नेताना मोठी कसरत करावी लागते. राजपथ, कर्मवीर पथावरूनच जनावरे हाकत न्यावी लागत असल्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही रोजची कटकट बनली आहे. गाय, म्हशीचे कळप शहरातील रस्त्यांवरून जाताना वाहनचालकांची त्रेधातिरपीट उडते. जनावरे रस्त्यातच बैठक मारत असल्यामुळे मोठ्या वाहनांना पुढे जाणे मुश्किल होते. अनेकदा दुचाकी जनावरांना धडकतात. गाड्या घसरण्याबरोबरच जनावरांनाही दुखापत होण्याची शक्यता असते.राजपथावर तर मोकाट जनावरांचे कळप मोकाट फिरत असतात. त्यांना मालक नसल्यामुळे ती कुठेही फिरत असतात. रस्त्याकडेला वाढलेले गवत, कचराकुंड्यांमध्ये टाकलेले अन्नपदार्थ, फळे, खराब भाजीपाला खाण्यासाठी मोकाट जनावरांबरोबरच पाळीव जनावरेही गर्दी करतात अन् वाहतुकीचा बोजवारा उडतो.कर्मवीर पथावरून बसस्थानकाकडे चरावयास जाणारी जनावरे रस्त्यावरच ठाण मांडून बसत असतात. विशेष म्हणजे ही जनावरे पाळीव आहेत. मात्र, त्यांचा मालक जनावरे सोडून देतो. दिवसभर ही जनावरे रस्त्यावर भटकून चरतात आणि दिवस मावळतीला गेला की आपल्या गोठ्यात जाऊन विसावतात. जनावरांच्या या सवयी मालकांना माहीत असल्यामुळे ते निर्धास्त राहतात. जनावरांच्या मागे फिरावे लागत नसल्यामुळे मालक निर्धास्त राहतात, मात्र वाहनचालकांची मोठी तारांबळ उडते. पशुधन हे शेतकऱ्यांसाठी जीव की प्राण असते. शहरातील रस्त्यांवरून जनावरे नेताना मालकांनी स्वत: त्यांच्या बरोबर असणे गरजेचे आहे. यामुळे जनावरे रस्त्यात न घुटमळता ती मोकळ्या जागेवर पोहोचतील आणि होणारे अपघात टळतील. जनावरांच्या जिवालाही धोकाकाही दिवसांपूर्वी राजपथावर पोलीस करमणूक केंद्रासमोर भटक्या गायींचा कळप रस्त्यावरून जात होता. दोन गायी रस्त्यातच उभ्या होत्या. सकाळी साडेअकराची वेळ असल्यामुळे वाहनांची वर्दळ जास्त होती. समोरून बस आली अन् रस्त्यात उभ्या असलेल्या एका गायीच्या जवळून गेली. गायीने थोडी जरी हालचाल केली असती तरी तिच्या पाठीचे हाड मोडले असते किंवा बसच्या धक्क्याने खाली पडून चाकाखाली येऊ शकली असती.