कराड येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे ओबीसी विभाग प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांच्या निवासस्थानी मंत्री वडेट्टीवार यांनी कार्यकर्यांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.
मंत्री वडेट्टीवार म्हणाले, ओबीसी विभाग हा महाराष्ट्रात ५४ टक्क्याहून अधिक आहे. महामंडळाचा कर्ज परतावा कोरोना संकटामुळे न केल्याने ओबीसी जनतेवर दाखल होणारे गुन्हे रद्द करण्यात येणार आहेत , महाज्योतिचे संचालक मंडळ बरखास्त करा ही मागणी प्रामुख्याने मांडण्यात आली आहे. १२५ कोटी निधी परत गेला त्या साठी प्रयत्न करणार असून महाराष्ट्र शासनाच्या वतीने ओबीसी महामंडळासाठी जास्तीत जास्त निधी देणार आहे. ओबीसी विभाग मंत्रालयाच्या माध्यमातून ओबीसी समाजाच्या सर्वतोपरी समस्या सोडविण्याचा प्रयत्न करू असे ते म्हणाले.
यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे स्वीय सहाय्यक गजानन आवळकर, राष्ट्रीय युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे, कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते, कराड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती महादेव देसाई , लक्ष्मण हाके, बाळासाहेब सानप, नंदकुमार कुंभार, संजय तडाखे,बनवडी गावचे सरपंच प्रदीप पाटील, संपतराव माळी, मुंढे ग्रामपंचायत सदस्य अशोक माळी, राज्यस्तरीय माळी महासंघाचे चिटणीस उत्तम माळी , आनंद सावंत, दीपक जाधव, दादा मंडळे आदी ओबीसी मान्यवर उपस्थित होते.
फोटो
कराड येथे मंत्री विजय वडेट्टीवार यांचे स्वागत करताना भानुदास माळी व इतर.