इयत्ता नववीत शिकणाऱ्या प्रणिती निंबाळकर हिला कविता करण्याचा छंद आहे. ज्यातून प्रेरणा मिळते त्या गोष्टीवर कविता करायची. असं करत करत तिने विविध विषयांवर कविता लिहिल्या. कुठलाही कार्यक्रम असला तर अतिशय शीघ्रतेने करण्याची तिची खासियत आहे. शाळेमधील स्नेहसंमेलनात जर एखादे पाहुणे आले आणि त्यांच्या भाषणातून जर तिला प्रेरणा मिळाली तर ती तत्काळ त्या पाहुण्यांचे कौतुक करणारी कविता लिहिते. शिक्षक तिला ती सादर करण्याची सूचना देखील करतात. ऐनवेळी केलेली कविता सर्वांनाच भावते.
छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणारी जिजामाता, देशाचे स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी रक्त सांडणारी झाशीची राणी, सगळे जग अज्ञानात असताना शेनाचे शिंतोडे अंगावर झेलत स्त्री शिक्षणाचा जागर करणारी सावित्री, अंतराळ वीर कल्पना चावला अशा स्त्री व्यक्तिमत्वाची कवितेच्या माध्यमातून गुंफण करून ती जगासमोर मांडण्याचा प्रयत्न प्रणितीने केला आहे. तिच्या कवितांमध्ये स्फुरण दिसते. स्त्रियांविषयीचा अभिमान दिसतो. तसेच स्त्री पुरुष समानतेची भावना देखील दिसते.
शाळेतल्या मुलींचे स्वप्न काय असेल तर कुठलं तरी एखादं क्षेत्र निवडायचं आणि त्यात यशस्वी व्हायचं, असे बहुतांश मुली ठरवतात. मात्र प्रणितीला वाटतं सर्वसामान्य सारखं स्वप्न काय ठेवायचं. माता जिजाऊ, झाशीची राणी, सावित्री सावित्रीबाई फुले, कल्पना चावला यांच्यासारखं जगाला प्रेरणा देणारे बनायचं.
ती आपल्या कवितेत म्हणते, माझंही असं एक मोठं स्वप्न आहे ती ते पूर्ण करणार हे नक्की आहे. शिवबाला घडवणारी माता जिजाऊ होती तिच्या तलवारीत न्यायाची आणि सत्याची धार होती. कारण तिच्यातला आणि स्वप्नात स्वराज्याची आस होती... इंग्रजांच्या सत्याला हलवून टाकणारी झाशीची राणी विषयी देखील प्रणितीने आपल्या कवितेतून कृतज्ञता व्यक्त केली आहे.
फोटो आहे