खटाव : कोरोनाचे वाढते संक्रमण तसेच कोरोनाचा प्रसार कमी व्हावा, यासाठी सातारा जिल्ह्यात दहा तारखेपर्यंत अधिक कडक निर्बंध लावण्यात आले आहेत.
परंतु तरीही खटावमध्ये काही ठिकाणी या निर्बंधांचे उल्लंघन करून नियम मोडणाऱ्यांवर आता पुसेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक चेतन मछले व कर्मचारी पोलिसांची करडी नजर असून, त्या ठिकाणी जाऊन संबंधितावर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.
खटावमध्ये पुसेगाव पोलीस स्टेशनच्यावतीने आता कडक बंदोबस्त लावण्यात आला असून, नियमाचे उल्लंघन करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कडक कारवाई तर केली जात आहेच, त्याचबरोबर त्यांना समजही देण्यात येत आहे. घरपोच सेवा असताना देखील काही व्यापारी सर्रास या नियमाला केराची टोपली दाखवून दुकाने उघडत असल्यामुळे अशा व्यापाऱ्यांना समज देऊन कोरोनाचा प्रसारक बनू नका, असाही सल्ला देत आहेत.
विनामास्क, विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर देखील पोलिसांची नजर असल्यामुळे व दंडात्मक कारवाई होईल, या भीतीमुळे नेहमी गजबजलेल्या रस्त्यावर देखील त्यामुळे वर्दळ कमी दिसत आहे.
०६खटाव कारवाई
कॅप्शन :
खटावमध्ये नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना समज देताना पुसेगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक चेतन मछले, उपसरपंच अमर देशमुख, अशोक कुदळे, सचिन जगताप उपस्थित होते.