सातारा : शासनाने घातलेल्या निर्बंधांची कडक अमंलबजावणी करा, अशा सूचना पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी पोलीस विभागाला दिल्या आहेत. या निर्बंधांच्या अंमलबजावणीची पाहणी शुक्रवारी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केली.
पालकमंत्री पाटील यांनी सातारा शहरातील पोवई नाका, मोती चौक, एस. टी. स्टॅन्ड परिसराची पहाणी केली. यावेळी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्यासह पोलीस विभागातील अधिकारी उपस्थित होते.
यानंतर पालकमंत्री पाटील यांनी नगर परिषदेच्या पूज्य कस्तुरबा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देवून तेथे सुरू असलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेची माहिती घेऊन लसीकरणासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकांची आस्थेवाईकपणे चौकशी केली.
फोटो ओळ : सातारा शहरातील विविध परिसरात शुक्रवारी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी पाहणी केली.