प्रगती जाधव-पाटील ।सातारा : दहावी आणि बारावी विद्यार्थ्यांच्या परीक्षा झाल्यानंतर ते आता ‘व्हेकेशन मूड’मध्ये आहेत. मुलं ‘चिल आॅऊट’च्या लहरीत असतानाच पालक मात्र विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या चिंतेने व्यथित आहेत. करिअरच्या अमाप संधी निवडताना योग्य आणि अयोग्य यातील फरक समजून घेण्यासाठी पालक-विद्यार्थी यांच्यात संवाद आणि त्याला तज्ज्ञांचा दुजारा महत्त्वाचा ठरत आहे.दहावी, बारावी प्रत्येकाच्या आयुष्यातले टर्निंग पॉर्इंट. त्यानंतर पुढे काय करायचं? हा मोठा प्रश्न अनेकांपुढे उभा राहत असतो.
शिक्षण क्षेत्रात अमाप संधी उपलब्ध असताना मुलांचा कल आणि त्यांची आवड या बाबींकडेही लक्ष देणं गरजेचं ठरतं. त्यामुळे आम्हाला वाटतं असं न म्हणता, तुम्ही सांगाल तसं असा संवादाचा सूर आवश्यक आहे. आपल्या भविष्याविषयी सजग असलेल्या पिढीला निर्णय स्वातंत्र्य मिळाले तर ते एकदम हटके काम करू शकतात, हे नक्की!उपलब्ध आर्थिक संधीतुम्हाला एखाद्या विषयात फक्त आवड आहे म्हणून लगेच घाईत कोणता निर्णय घेऊ नका. त्यात पुढे करिअरच्या काय संधी आहेत, आर्थिकदृष्ट्या किती सक्षम होता येईल? या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून मगच निर्णय घ्या.निरीक्षण आवश्यकसध्या आजूबाजूला कोणत्या आणि काय गोष्टी घडत आहेत, त्यांचा अवश्य विचार करा. एखाद्या फिल्डमध्ये आत्ता जरी चांगले करिअर होऊ शकत असले, तरी जेव्हा तुमचे शिक्षण पूर्ण होईल तेव्हा तसाच स्कोप असेल का, याचा नीट विचार करा.मैत्रीमुळे निर्णय नकोएखादा मित्र किंवा मैत्रीण एखाद्या कोर्सला प्रवेश घेत असेल तर तुम्हीसुद्धा घेतलाच पाहिजे, असे नाही. तुमच्या मित्राच्या किंवा मैत्रिणीच्या आवडीनिवडी आणि तुमच्या आवडीनिवडी यात खूप फरक असतो.आर्थिक बाजूंचा विचार आवश्यकचएखाद्या कोर्सला प्रवेश घ्यायचंच ठरवलं असेल तर मग भविष्यात त्या कोर्ससाठी येणाऱ्या खर्चाचा अंदाज घ्या आणि तो घरच्यांसोबत अवश्य डिस्कस करा.अनुभवींचा सल्लातुम्हाला सिनिअर असणारे जे कोणी असतील, ज्यांचे करिअर सुरू आहे, अशा अनुभवींचा सल्ला अवश्य घ्या. कारण तेसुद्धा नुकतेच तुमच्यासारख्या फेजमधून गेले आहेत.
पालकांनी स्वत:ची आवड विद्यार्थ्यांवर लादण्यापेक्षा विद्यार्थ्यांची आवड लक्षात घ्यावी. तसेच त्यांना वेगवेगळ्या शिक्षणाच्या संधीची माहिती दिली पाहिजे.- प्रा. डॉ. दीपक सातपुजे, विद्यादीप फाउंडेशन, सातारा