येथील आदर्श ज्युनिअर कॉलेज व आनंदराव चव्हाण विद्यालयात आयोजित ३२व्या राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा सप्ताहाच्या समारोप समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून कळके बोलत होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी अशोकराव थोरात होते. यावेळी मुख्याध्यापक एस. वाय. गाडे, उपमुख्याध्यापक एस. बी. शिर्के, पर्यवेक्षक ए. एन. शिर्के, आदर्श ज्युनियर कॉलेजच्या विभागप्रमुख एस. डी. पाटील, पोलीस नाईक प्रवीण कोळी, सचिन नाईक, वैभव निकम, आर. एस. पी. अधिकारी जगन्नाथ कराळे, रामचंद्र राठोड व एन. सी. सी. अधिकारी प्रमोद खाडे, विद्यालयातील सर्व शिक्षक विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.
अशोकराव थोरात म्हणाले, भारतात रस्ते अपघातात मृत्यूचे प्रमाण खूपच जास्त आहे. यासाठी समाजात प्रबोधन करणे व ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. पोलीस व जवान आहेत म्हणून आपण सर्वजण शांत झोप घेतो. त्या सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे व त्यांना सहकार्य करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. कार्यक्रमापूर्वी मलकापूर शहरात रस्ते व वाहतूक सुरक्षा प्रबोधन फेरी काढण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. वाय. गाडे यांनी केले. सूत्रसंचालन शरद तांबवेकर यांनी केले. रामचंद्र राठोड यांनी आभार मानले.
फोटो : मलकापूर (ता.कराड) येथे वाहतूक सुरक्षा सप्ताहाच्या समारोप कार्यक्रमात बोलताना पोलीस निरीक्षक रघुनाथ कळके.
चौकट
विविध स्पर्धांचे आयोजन
राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा सप्ताह समारोपप्रसंगी विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये रांगोळी, निबंध, चित्रकला, घोषवाक्य व पोस्टर प्रदर्शन स्पर्धांचा समावेश केला होता. त्याच वेळी स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षिसे व प्रशस्तिपत्र देऊन उपस्थितांच्या हस्ते गौरवण्यात आले.