-प्रगती जाधव-पाटील ।सातारा : शासनाने क्यूआर कोडच्या मदतीने अध्यापनात जिवंतपणा आणण्याचा प्रयत्न केला; पण इंटरनेटशिवाय या कोडचा काहीच उपयोग नाही. त्यामुळे साताºयातील तंत्रस्नेही शिक्षकाने चक्क आॅफलाईन अॅनिमेटेड फ्लिपबुकचा शोध लावला आहे. यामुळे हा प्रकल्प इंटरनेटशिवाय वाड्यावस्त्यांवर शिक्षणाची कवाडे खुली करून देणार आहे. हा प्रकल्प यशस्वी ठरल्यास राज्यासाठी दिशादर्शक ठरू शकतो.
लहान मुलांना दृकश्राव्य माध्यमातून शिक्षण मिळाले तर ते चिरकाल स्मरणात राहते, हे अभ्यासातून सिद्ध झाले. त्यानंतर आता शासनस्तरावर डिजिटलने झेप घेतली. पाठ्यपुस्तकांवर शासनाने क्यूआर कोड लावले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना इंटरनेटच्या आधारे हे कोड स्कॅन करून विविध वेबसाईटवरून व्हिडीओ आणि स्वाध्याय पाहावे लागतात. शहरी आणि निमशहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी ही सोय उत्तम ठरली असली तरी वाड्या वस्त्यांवरील मुलांना इंटरनेट नसल्यामुळे या सोयीचा लाभ घेणं अशक्य होत होतं. गाव-वस्त्यांवरील विद्यार्थ्यांची ही गैरसोय लक्षात घेऊन विजयनगर, ता. माण येथील तंत्रस्नेही शिक्षक बालाजी जाधव यांनी युक्ती शोधली. इंटरनेटशिवाय सुरू होणाºया अॅनिमेटेड फ्लिपबुकची निर्मिती त्यांनी केली. त्यामुळे येथे उपलब्ध असलेले व्हिडीओ पाहणे, आॅडिओ ऐकणे, प्रश्नांचा सराव करणे याबरोबरच पाठ्यपुस्तकातील रिकाम्या जागा, जोड्या लावा, आकृत्या काढा, आदी गोष्टी विविध रंग वापरून करणं विद्यार्थ्यांना शक्य झालं आहे. शिक्षक फ्लिपबुकद्वारे अध्यापन करू शकतात, तर विद्यार्थ्यांना हे सरावासाठी उपयुक्त ठरू शकते.
जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेतील सुमारे १ लाख २३ हजार विद्यार्थ्यांना या फ्लिपबुकचा फायदा होणार आहे. हा प्रयोग जिल्हा परिषदेत यशस्वी झाल्यास राज्यस्तरावर पुन्हा एकदा साताºयाचा प्रोजेक्ट दिशादर्शक म्हणून ठसा उमटवण्यासाठी सज्ज झाला आहे.हे आहेत नवीन बदल !यापूर्वी फ्लिपबुकमध्ये सर्व बाबी वेगवेगळ्या ठिकाणाहून शोधाव्या लागायच्या. पाठाचा व्हिडीओ एका वेबसाईटवर, स्वाध्याय दुसरीकडे आणि आॅनलाईन टेस्ट तिसरीकडे होती. तर रेखाटणेसारख्या क्रिया पाटीवर, वहीवर किंवा अन्यत्र कराव्या लागत होत्या. सर्व समस्या सोडवून हे एकाच जागी सहज आपल्याला फ्लिपबुकमधून वापरावयास मिळू शकते. त्यामुळे कमी वेळेत अधिक परिणामकारकता मिळावी, यासाठी याचा वापर होणार आहे.
साधनांसोबत मुलांची मनोरंजकता वाढावी, लक्ष केंद्रित व्हावे, यासाठी त्या पाठावर आधारित अशा चित्रांचा एक छोट्या आकराचा स्लाईड शो प्रत्येक पानावर समाविष्ट केला आहे. शब्दांचा त्या चित्रावरून सहज बोध व्हावा, हा त्यामागचा हेतू. त्यामध्ये त्या सर्व इमेजेस अॅनिमेशनमध्ये सुरू राहतात, हे विशेष!या अॅपद्वारे हे करणं सहज सोपंस्क्रीनवर पुस्तकाची पानं उलटणं सोपंक्लिक करताच आॅडीओ, व्हिडीओ, स्वाध्यायइपिक पेन या टूलच्या साह्याने चित्र रेखाटने सोपेगणिते सोडवणं, जोड्या लावणं एका क्लिकवररोज मनसोक्त सराव करणं आणि अभ्यासासाठी उपयुक्त
सुमारे सव्वालाख विद्यार्थ्यांना आॅफलाईन अॅनिमेटेड फ्लिपबुकचा लाभ घेता येणार आहे. आमच्या शाळेतील शिक्षकाने याची निर्मिती केल्याचा विशेष अभिमान आहे.- डॉ. कैलास शिंदे,मुख्य कार्यकारी अधिकारी, साताराइंटरनेटअभावी विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन हे अॅप करण्याचा प्रयोग यशस्वी झाल्याचा आनंद आहे. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून राज्यात अन्यत्रही असा प्रयोग राबविता येईल.- बालाजी जाधव, तंत्रस्नेही शिक्षक, विजयनगर, ता. माण