शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

पोवई नाक्यावर भुयारी मार्गाचे खोदकाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 11:11 PM

सचिन काकडे ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : पुणे-मुंबईच्या धरतीवर साताऱ्यातील पोवई नाक्यावर ग्रेड सेपरेटरची बांधणी होत असून, जिल्ह्यातील ही पहिलीच योजना आहे. एकूण १ हजार २३० मीटर लांबीच्या ग्रेड सेपरेटरसाठी तब्बल ४९ कोटी निधीची तरतूद करण्यात आली आहे. सध्या पोवई नाका सर्कल येथे १०० मीटर लांबीच्या भुयारी मार्गाचे खोदकाम हाती घेण्यात ...

सचिन काकडे ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : पुणे-मुंबईच्या धरतीवर साताऱ्यातील पोवई नाक्यावर ग्रेड सेपरेटरची बांधणी होत असून, जिल्ह्यातील ही पहिलीच योजना आहे. एकूण १ हजार २३० मीटर लांबीच्या ग्रेड सेपरेटरसाठी तब्बल ४९ कोटी निधीची तरतूद करण्यात आली आहे. सध्या पोवई नाका सर्कल येथे १०० मीटर लांबीच्या भुयारी मार्गाचे खोदकाम हाती घेण्यात आले आहे. लवकरच कामात अडथळा ठरणाºया जलवाहिन्या जीवन प्राधिकरणच्या सहकार्याने काढण्यात येणार आहेत.आठ रस्ते एकत्र जोडणाºया पोवई नाका परिसरातून दररोज सुमारे २ लाख ७१ हजार ४५० वाहने ये-जा करतात. शहरातील सर्वाधिक वाहतुकीचा ताण याच ठिकाणी पाहावयास मिळतो. या समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी पोवई नाका येथे ग्रेड सेपरेटर (उड्डाणपूल) उभारण्याचे काम बांधकाम विभागाकडून हाती घेण्यात आले आहे.शिवाजी सर्कलजवळ खोल चर खोदून पहिल्या टप्प्यात लॉ कॉलेज ते तहसील कार्यालय या मार्गाचे काम हाती घेण्यात येणार आहे. तर दुसºया टप्प्यात कोल्हापूरकडे जाणाºया रस्त्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. या संपूर्ण कामासाठी तब्बल ४९ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. केंद्रीय मार्ग निधीतून हे काम केले जात असून, दोन वर्षांत ते पूर्णत्वास येणार आहे.पोवई नाका येथे केल्या जाणाºया भुयारी मार्गाची लांबी ३३० मीटर असणार आहे. कोल्हापूर, कास, अदालत वाडा रोड व बसस्थानकातून येणारी वाहने याच भुयारी मार्गातून ये-जा करणार आहेत. एकूण वाहतुकीपैकी ४५ टक्के वाहतूक स्थानिक नागरिकांची असल्याने ती ग्रेड सेपरेटरवरील सिग्नलद्वारे होणार असून, वाहतुकीचा ताण पूर्णत: कमी होणार आहे.महाडचा पूल बांधणाºया कंपनीकडून निर्मितीमुंबई-गोवा महामार्गावरील महाड-पोलादपूरला जोडणारा सावित्री नदीवरील ब्रिटिशकालीन पूल ३ आॅगस्ट २०१६ रोजी वाहून गेला होता. या पुलाच्या शेजारीच तातडीने नव्या पुलाचे बांधकाम करण्यात आले. पुणे येथील टी. अँड. टी प्रा. लि. या कंपनीमार्फत या पुलाची उभारणी करण्यात आली. याच कंपनीने साताºयातील ग्रेड सेपरटेचे काम हाती घेतले आहे.असा असणार सेपरेटरतहसील कार्यालय (बसस्थानक मार्ग) ते कोल्हापूर बाजूकडील रस्त्याची लांबी ४८० मीटर तर तहसील कार्यालय ते पंढरपूर बाजूकडील रस्त्याची लांबी २३० मीटर आहे. कास-अदालत वाडा मार्ग ते तहसील कार्यालय या रस्त्याची लांबी ५२० मीटर इतकी आहे. या ठिकाणीच ग्रेड सेपरेटर उभारण्यात येणार आहे. याची एकूण लांबी १ हजार २३० मीटर तर रुंदी ५.५० मीटर इतकी असणार आहे.पाणी निचºयासाठी पाईपलाईनग्रेड सेपरेटरच्या बाजूला सेवा रस्त्यांचे बांधकाम केले जाणार आहे. तसेच पावसाळ्यात पाण्याचा निचरा व्हावा यासाठी २०० मीटर लांबीची स्वतंत्र पाईपलाईन बसविली जाणार आहे. सेपरेटरचे पूर्णपणे क्रॉँक्रिटीकरण केले जाणार आहे.