अनुसूचित विभागाची बैठक
सातारा : जिल्हा काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाची आढावा बैठक काँग्रेस भवनात नुकतीच जिल्हाध्यक्ष मनोजकुमार तपासे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी अनुसूचित जाती विभागातील सर्व तालुकाध्यक्ष व जिल्हा कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.
पुरुष भिक्षेकरी गृहाच्या आवारात वृक्षारोपण
सातारा : भारतीय जनता पक्षाच्या वतीने येथील पुरुष भिक्षेकरी गृहाच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. तसेच मास्क, सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा सुवर्णा पाटील, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा डॉ. सुरभी भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. ओबीसी मोर्चाच्या अध्यक्षा गीता लोखंडे, रीना भणगे, वैशाली टंकसाळे, गृहाचे अधीक्षक शिवाजी खुडे, डॉ. बजरंग खाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
तरवे लावणीच्या प्रतीक्षेत
सातारा : जिल्ह्यातील पाटण, जावली, सातारा व वाई तालुक्यांतील काही भागांत भाताचीच शेती केली जाते. मात्र, सध्या पावसाने दडी मारल्यामुळे या ठिकाणचे भाताचे तरवे लावणीच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र आहे. जावली व पाटण तालुक्यात डोंगराळ भाग अधिक असून पावसाचे प्रमाण जास्त आहे. या तरव्यांमधील भात रोपे वाढूनही अद्याप लावणीच्या कामांना पावसामुळे सुरुवात झालेली नाही.
आरक्षण बचाओ आंदोलन
सातारा : शासन निर्णयानुसार एससी, एसटी, व्हीजे, एनटीएस, बीसी व ओबीसी या प्रवर्गांचे पदोन्नतीमधील आरक्षण नाकारण्यात आल्याचा निषेध राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या वतीने २६ जुलैपर्यंत चार टप्प्यांत करण्यात येणार आहे. आरक्षण बचाओ, लोकतंत्र बचाओ आंदोलनन करण्यात येणाऱ्याचे निवेदन देण्यात आले आहे.
..................