दहिवडी : शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरच्या ४० व्या सातारा जिल्हास्तरीय युवा महोत्सवामध्ये दहिवडी कॉलेजच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी एकूण १२ कला प्रकारांमध्ये सहभाग घेतला.
त्यापैकी मराठी वक्तृत्वमध्ये ऋतुजा जगदाळे हिने द्वितीय, शास्त्रीय सुरवाद्यमध्ये संकेत जगदाळे याने द्वितीय, शास्त्रीय गायनमध्ये सौरभ माने याने तृतीय तर पाश्चिमात्य एकल गायनमध्ये आरती पवार हिने तृतीय क्रमांक मिळवल्याची माहिती प्रभारी प्राचार्य डॉ. बी. एस. बलवंत यांनी दिली.
या युवा महोत्सवाचे आयोजन आभासी पद्धतीने बाळासाहेब देसाई कॉलेज, पाटण यांनी केले होते. सर्व यशस्वी विद्यार्थी-विद्यार्थिनींची वेणुताई चव्हाण कॉलेज, कऱ्हाड येथे होणाऱ्या मध्यवर्ती युवा महोत्सवासाठी निवड झाली आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थी, विद्यार्थिनी यांचे प्रभारी प्राचार्य डॉ. बी. एस. बलवंत, डॉ. ए. एन. दडस, प्रा. पी. के. टोणे, प्रा. भक्ती पाटील, डॉ. ए. यु. चोपडे, प्राध्यापक यु. ई. शिंदे, सांस्कृतिक विभागाचे सदस्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.