सातारा : शहरात गेली पन्नास वर्षे वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या रजनी क्लासच्या अकरा विद्यार्थ्यांनी सीए परीक्षेत यश मिळविले आहे. सीए फाउंडेशन आणि सीए इंटरमिजिएट या परीक्षांमध्ये १४ विद्यार्थ्यांना यश प्राप्त झाले. रजनी क्लासेसचे ज्येष्ठ मार्गदर्शक प्रा. राम कदम, प्रा. विश्रांत कदम, प्रा. ऋषिकेश कदम यांच्या उपस्थितीत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
सीए फायनल परीक्षेत माधुरी माळी, शैलेश महाडिक, अमृता पवार, सोमनाथ शेडगे, बालिया मर्ढेकर तसेच सी.ए. इंटरमिजिएट परीक्षेमध्ये प्रगती कुंभार, श्रुती चव्हाण, श्रुती भोसले, श्रीनिवास शिंपुकडे यांचा समावेश आहे. चालू शैक्षणिक वर्षासाठी अकरावी-बारावीच्या नवीन बॅचेससाठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. अधिक माहितीसाठी रजनी क्लासेस, कन्या शाळेमागे सातारा येथे संपर्क साधावा, असे आवाहन प्रा. कदम यांनी केले. (वा. प्र.)
फोटो ओळी :
साताऱ्यातील रजनी क्लासेसमधील सीए परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा प्रा. राम कदम, प्रा. विश्रांत कदम, प्रा. ऋषिकेश कदम यांनी गौरव केला.