खटाव : शिवाजी भोसले एज्युकेशनल वर्ल्डतर्फे आयोजित राज्यस्तरीय वेशभूषा स्पर्धेत गट क्रमांक एकमध्ये कातरखटाव येथील रुद्रांश मदने याने प्रथम क्रमांक मिळविला. अंगणवाडी क्रमांक २५६ मध्ये रुद्रांश शिकत आहे, त्याला पोपटराव मदने, पद्मजा मदने यांनी मार्गदर्शन केले. या यशाबद्दल त्यांचे किरण उदमले, डॉ. संतोष देशमुख, डॉ. संतोष जाधव आदींनी कौतुक केले.
खावलीत काम ठप्प
सातारा : सातारा - लातूर महामार्गाचे काम पूर्ण होत असतानाच खावली ते क्षेत्र माहुलीदरम्यान सुमारे दीड ते दोन किलामीटर रस्ता खोदून त्याचे काम ठप्प ठेवण्यात आले आहे. यामुळे वाहनचालकांची प्रचंड गैरसोय होत आहे. वादावादी, धुळीच्या साम्राज्याने त्रास होत आहे.
बाजारपेठेत कोंडी
रहिमतपूर : रस्त्याच्या दुतर्फा तसेच प्रमुख चौकांमध्ये होत असलेल्या अनिर्बंध वाहन पार्किंगमुळे बाजारपेठेत गर्दी होत आहे. त्यामुळे बाजारात येणाऱ्या जाणाऱ्यांना याचा नाहक त्रास सोसावा लागत आहे. यावर उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
वाहतूक कोंडीकडे दुर्लक्ष
सातारा : शहरातील वाहतुक कोंडीच्या प्राथमिक आराखड्याबाबत पालिकेतील स्थायी समितीचे सदस्य व पोलीस अधिकारी यांच्या दोन वर्षांपूर्वी बैठक झाली. तरीही पालिकेसह पोलीसही वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरल्याचे दिसत आहे.
भरती लांबल्याने निराशा
सातारा : पोलीस दलासह लष्करी भरतीची प्रशासकीय कार्यवाही थंडावल्याने जिल्ह्यातील तरुणाईत निराशा पसरली आहे. भरतीच्या आशेवर असलेल्या या तरुणांनी नियमित व्यायाम सराव करून त्यासाठी सज्ज होत असतानाच भरती लांबल्याने तरुणाई नाराज झाली आहे.