येथील कृष्णा अभिमत विद्यापीठात आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी कृष्णा अभिमत विद्यापीठाचे अतिरिक्त संशोधन संचालक डॉ. डी. के. अग्रवाल, डॉ. विठ्ठल धूळखेड, डॉ. अर्चना गौतम, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. रमाकांत श्रीवास्तव, डॉ. सुहास देशमुख, संशोधक विद्यार्थी चारुदत्त जगताप, निखिल भिसे, अक्षय गावडे उपस्थित होते.
डॉ. अग्रवाल म्हणाले, कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांनी सातत्याने समाजोपयोगी संशोधनाला चालना दिली. आरोग्य क्षेत्रातील संशोधनाचा लाभ सामान्यातील सामान्य नागरिकाला व्हावा, यासाठी ते प्रयत्नशील आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाच्या संशोधन संचालनालयाने विविध प्रकारची संशोधने केली असून, त्यांची देशपातळीवर दखल घेतली आहे. यापूर्वी कृष्णा विद्यापीठाने पर्यावरणपूरक अशा मास्कचे संशोधन केले. तसेच वैद्यकीय उपकरणांचे संपूर्ण निर्जंतुकीकरण करणाऱ्या यूव्ही सेवक ३६० या उपकरणाचे संशोधनही केले. ज्यामुळे आता पीपीई कीट निर्जंतुकीकरण करून पुन्हा वापरणे शक्य झाले आहे. तशाच पद्धतीने साथीच्या विविध रोगांवर उपचार करण्यारे डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफ व अन्य आरोग्य कर्मचाऱ्यांना स्वत:चा जीव धोक्यात घालून सेवा द्यावी लागते. हा संसर्ग टाळण्यासाठी सर्वांना पीपीई कीट घालणे अनिवार्य आहे. मात्र, हवेचे योग्य संतुलन होत नसलेल्या पॅकबंद पीपीई कीट घालून सलग २४ तास सेवा देणे मोठे त्रासाचे ठरते. हा त्रास कमी करण्यासाठी येथील कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठाचे संशोधन संचालनालय आणि शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या चार महिन्यांच्या संयुक्त प्रयत्नातून पीपीई कीटमध्ये हवा खेळती ठेवणाऱ्या उपकरणाचे यशस्वी संशोधन केले आहे. या अनोख्या उपकरणामुळे किटमधे हवा खेळती राहणार असून, परिधान करणाऱ्यांच्या शरीराचे तापमान सामान्य राहण्यास व वापरासाठी सुसह्य ठरणार आहे. मुख्य म्हणजे या उपकरणात ०.१ मायक्रॉन आकाराचा हेपा फिल्टर बसविण्यात आला आहे.
- चौकट
विषाणूजन्य आजारांपासून होणार सुरक्षा
नव्याने निर्मिती करण्यात आलेले हे पीपीई किट वजनाला हलके असून, हाताळण्यास सोपे आहे. त्यामुळे डॉक्टरांसह नर्सेस, वॉर्डबॉय व अन्य आरोग्य कर्मचाऱ्यांना विषाणूजन्य साथीच्या आजारांच्या काळात उपचार करताना हे उपकरण त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे डॉ. डी. के. अग्रवाल यांनी सांगितले.
- चौकट
पाच लाखांचे पॅकेज नाकारून संशोधन
पीपीई कीटमध्ये हवा खेळती ठेवणाऱ्या या उपकरणाच्या संशोधन आणि विकासासाठी संशोधक विद्यार्थी चारुदत्त जगताप, निखिल भिसे, अक्षय गावडे यांनी पाच लाखांचे पॅकेज नाकारले. त्यांना कृष्णा अभिमत विद्यापीठाचे अतिरिक्त संशोधन संचालक डॉ. डी. के. अग्रवाल, डॉ. विठ्ठल धूळखेड, डॉ. अर्चना गौतम, कऱ्हाड शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. रमाकांत श्रीवास्तव, डॉ. सुहास देशमुख यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
फोटो : २२केआरडी०६
कॅप्शन : कऱ्हाडच्या कृष्णा रुग्णालयात आयोजित पत्रकार परिषदेत पीपीई किटचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.