शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

जिल्ह्यात पाच वर्षांनंतर प्रथमच साखरेचा उच्चांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2018 10:55 PM

संजय कदम ।लोकमत न्यूज नेटवर्कवाठार स्टेशन : जिल्ह्यातील कारखान्यांनी गाळपाच्या आजवरच्या सीमा पार केल्या. मार्चअखेर ९७ लाख क्विंटल साखर उत्पादनाचा टप्पा कारखान्यांनी पार केला आहे. गाळप हंगाम घेतलेल्या जिल्ह्यातील तेरा साखर कारखान्यांपैकी पाच कारखान्यांचे गाळप बंद झाले. उरलेल्या आठ कारखान्यांचे गाळप एप्रिल अखेरपर्यंत चालणार असल्याने जिल्हा शंभर लाख क्विंटल साखर ...

संजय कदम ।लोकमत न्यूज नेटवर्कवाठार स्टेशन : जिल्ह्यातील कारखान्यांनी गाळपाच्या आजवरच्या सीमा पार केल्या. मार्चअखेर ९७ लाख क्विंटल साखर उत्पादनाचा टप्पा कारखान्यांनी पार केला आहे. गाळप हंगाम घेतलेल्या जिल्ह्यातील तेरा साखर कारखान्यांपैकी पाच कारखान्यांचे गाळप बंद झाले. उरलेल्या आठ कारखान्यांचे गाळप एप्रिल अखेरपर्यंत चालणार असल्याने जिल्हा शंभर लाख क्विंटल साखर उत्पादनाचा टप्पा निश्चित पार करणार आहे.साखर निर्मितीत महाराष्ट्र देशात अव्वल ठरल्यानंतर या हंगामात सातारा जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांतील सर्वाधिक गाळपाचे रेकॉर्ड या हंगामात मोडणार आहे. यामध्ये २०१४-१५ मध्ये ७५ लाख ६५ हजार ६३२ लाखमेट्रिक टन गाळप तर ८९ लाख ०६ हजार २९ लाख क्विंटल साखर उत्पादन, २०१५-१६ मध्ये ७७ लाख ६५हजार ३७८ लाख मेट्रिक टन गाळप तर ९० लाख ६६ हजार ९१८ लाख क्विंटल साखर उत्पादन, २०१६-१७ मध्ये ५४ लाख ३६ हजार ९३५ लाख मेट्रिक टन गाळप तर ६४ लाख ५१ हजार ७२ लाख क्विंटल साखर उत्पादन तर २०१७-१८ मध्ये मार्चअखेर ८१लाख ७६ हजार ९८७ लाख मेट्रिक टन गाळप तर ९७ लाख १४ हजार ९५५लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. जिल्ह्याचा गाळप हंगाम ५ नोव्हेंबरपासून सुरू झाला. या हंगामात एकूण १४ कारखान्यांपैकी यंत्रणेअभावी प्रतापगड कारखाना सुरुवातीपासूनच बंद राहिला तर उर्वरित सर्व १३ कारखानेमार्च अखेरपर्यंत गाळपास सज्ज राहिले. यातील श्रीराम-जवाहर, फलटण, लोकनेते बाळासाहेबदेसाई पाटण, रयत कºहाड, न्यू फलटण साखरवाडी, स्वराजफलटण या पाच कारखान्यांचे गाळप आता बंद झाले आहेत. उर्वरित आठ कारखाने एप्रिलअखेर बंद होणार आहेत.एफआरपीबाबत उदासीनताएका बाजूला जिल्ह्यातील साखर उत्पादन उच्चांकी वाढले असताना दुसऱ्या बाजूला मात्र जाहीर एफआरपी देण्याबाबत बहुतांशी कारखाने उदासीन राहिले आहेत. त्यामुळे शेतकºयांचा ‘मार्च एंड’ मात्र निराशजनक राहिला. अनेक कारखाने आजही शासनाच्या एफआरपी कायद्याला कोलदांडा दाखवत आहेत. मात्र, या कारखानदाराबाबत शासन बघ्याची भूमिका घेत आहे. एफआरपी नियमाप्रमाणे १४ दिवसांत देणं सर्वच कारखानदारांना बंधनकारक असतानाही ती न दिल्यामुळे शेतकरी मात्र कारखानदारांच्या भूमिकेबाबत नाराज आहेत.